Share

वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी बनला पाकिस्तानचा पोलीस अधिकारी..! पाहा VIDEO

Published On: 

मुंबई : पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदी याने आपल्या वेगवान गोलंदाजीने मोठ्या फलंदाजांना थक्क केले आहे. तो आता नव्या रुपात दिसणार आहे. त्याला खैबर पख्तूनख्वा पोलिसांनी मानद डीएसपी पद दिले आहे. याशिवाय त्याला गुडविल अॅम्बेसेडरही करण्यात आले आहे. त्याचे वडीलही येथे पोलीस अधिकारी होते आणि ते आता निवृत्त झाल्याची माहिती आहे. त्याचा भाऊही पोलीस खात्यात कार्यरत आहे. आफ्रिदी तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध आहे, त्यामुळे त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. या पाऊलामुळे लोकांचा त्याच्यावरील विश्वास वाढेल, अशी आशा पोलिसांना आहे.

शाहीन आफ्रिदीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नवीन जबाबदारी सोपवण्यात आल्यावर शाहीन आफ्रिदीने सांगितले, की पोलिसांचा राजदूत होणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ”खैबर पख्तुनख्वा पोलिसांचा सदिच्छा दूत होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आपली मातृभूमी सुरक्षित ठेवल्याबद्दल मला उर्वरित पाकिस्तानी सैन्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करायची आहे”, असे आफ्रिदीने म्हटले.

डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी हा पाकिस्तान संघाचा भाग आहे आणि संघाला या महिन्यात २ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेला जायचे आहे. गेल्या वर्षी यूएई मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात त्याने रोहित शर्मा आणि केएल राहुलला बाद करून बरीच हवा केली होती. याच कारणामुळे प्रथमच विश्वचषकात भारतीय संघाला पराभूत करण्यात पाकिस्तानचा संघ यशस्वी ठरला.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!