Share

कोरोनामुळे औरंगाबादेत गर्दीच्या ठिकाणी लॉकडाऊन? वाचा सत्य काय आहे..

Published On: 

औरंगाबाद : रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर लॉकडाऊन केले जाइल असा सूचक इशारा मागील आठवड्यात पालकमंत्री सुभाष देसाईंनी दिला होता. त्यानंतर आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी सुध्दा गर्दीच्या ठिकाणी लॉकडाऊन करू शकतो असा इशारा २ दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलतांना दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून शहरात लॉकडाऊन लागणार या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी ३७१ कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. कोरोना संसर्ग पुन्हा एकदा शहरात जोमाने पसरू लागला आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यावेळी घराघरात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरालाच कोरोनाने विळखा घातल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातील नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत.

लॉकडाऊनबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगत आहेत. मात्र अजून एकाही अधिकाऱ्याने याबाबत स्पष्टपणे खुलासा केलेला नाही. तरीही शहरवासीय लॉकडाऊनच्या भीतीने त्रस्त झाले आहेत. कारण गेल्या वर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना मोठ्या यातना सहन कराव्या लागल्या होत्या. काहींना २ वेळचे जेवणही मिळत नव्हते. त्यामुळे लॉकडाऊनच्या नावाने अनेकांचा थरकाप उडत आहे.

जास्त गर्दी असलेल्या भागांमध्ये लॉकडाऊन केले जाईल अशी माहिती याआधीच आयुक्तांनी दिली होती. त्यातच बुधवारी शहरी भागातच रुग्णांनी ३०० चा आकडा क्रॉस केल्यामुळे शहरातील काही भागांमध्ये लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवा वेगाने फिरत आहेत.

पैठण गेट, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, जाधवमंडी हे औरंगाबादमधील सर्वाधिक गर्दी होणारे परिसर मानले जातात. या गर्दीमुळे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हेच भाग प्रशासनाच्या निशाण्यावर असल्याचे बोलले जाते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!