अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामना आजपासून (४ मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झाला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाहुणा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरला आहे. परंतु भारतीय गोलंदाजांनी त्यांचा निर्णय चुकीचा ठरवत एका मागे एक फलंदाजांना माघारी धाडलं.
इंग्लंडच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांसमोर लोटांगण घातल्याचं दिसून आलं आहे. पहिल्या दिवशीच इंग्लंडचा डाव अवघ्या २०५ धावांवर गुंडाळला आहे. भारताच्या डावाला सुरुवात झाली असून सलामीवीर शुबमन गिल बाद झाला आहे.तर, आजच्या दिवसाखेर २४ धावांवर १ बाद अशी भारताची स्थिती आहे. दरम्यान, या कसोटी सामन्यात देखील भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये गरमा-गरमी सुरु असल्याचं दिसून आलं.
मैदानात बेन स्टोक्स आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली एकमेकांना भिडले. हा वाद एवढा वाढला की अंपायर्सना मध्यस्थी करावी लागली आहे. भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना कर्नाटक विराट कोहली आणि बेन स्टोक्समध्ये शाब्दिक चकमक झाली. याची सुरुवात मोहम्मद सिराजच्या एका बाऊन्सर चेंडू पासून झाली होती. यानंतर, स्टोक्स आणि कोहली मैदानातच एकमेकाला भिडले. अखेर दोन्ही पंचांना मध्यस्थी करुन वाद आटोक्यात आणावा लागला.
दरम्यान, इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 55 धावा केल्या. तर डॅनियल लॉरेन्सने 46 धावांची खेळी केली. तर, या सामन्यात देखील फिरकीपटूंचा बोलबाला असून तिसऱ्या कसोटीत ११ बळी घेणाऱ्या अक्षर पटेलने चार गडी बाद केले. तर, आर. अश्विनने 3, मोहम्मद सिराजने २ आणि वाशिंग्टन सुंदरने १ बळी घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारला लाज वाटायला हवी’ इंधन दरवाढीवरून प्रकाश राज आक्रमक !
- उद्धव ठाकरेंना बाबरी बाबतचं ‘ते’ वक्तव्य भोवणार ? अबू आझमींनी दिला इशारा
- …अन् विरोधी पक्षनेत्यांनी केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन !
- पूजा चव्हाण प्रकरणात आणखी एक ट्वीस्ट; भाजपच्या ‘या’ नेत्याने पूजाचा लॅपटॉप चोरल्याची चर्चा
- ‘जय श्रीराम’ची एलर्जी असल्यानेच शिवसेनेचा ममता बॅनर्जींना पाठींबा; भाजप आमदाराची टीका


