मुंबई : मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आल्याचे बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतील सर्व शाळा २ मार्चपासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात मुंबई महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. तसेच यासंदर्भात परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.
बीएमसीने जारी केलेल्या परिपत्रकात म्हंटले आहे की, बोर्डच्या तसेच माध्यमाच्या नगरबाहय विभागाच्या सर्व शाळा, विशेष आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्व शाळा, पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच कोरोनापूर्वीच्या वेळापत्रकानुसार शाळांना मधली सुट्टी असेल तसेच विद्यार्थ्यांना सुट्टीत पूर्वीप्रमाणे आहार घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, विद्यार्थी शाळेत प्रवेश करताना त्यांचे तापमान तपासणी करण्यात येणे गरजेचे असून शालेय परिसरात विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक असेल. तसेच शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती १०० टक्के असणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या :
- “राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे”, उदयनराजेंचा इशारा
- “वडिलांना धुणी-भांडी करण्याची भीती वाटतेय आणि चिरंजीव…”, भातखळकरांचे टीकास्त्र
- भारतीय माजी खेळाडू विनोद कांबळीला अपघात प्रकरणात अटक
- Maratha reservation strike : छत्रपती संभाजीराजेंची शुगर लेव्हल व रक्तदाब कमी; डॉक्टरांचा रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला
- भगतसिंह कोश्यारींच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन राजकारण तापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

