🕒 1 min read
सोलापूर- टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंध जोडले गेलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर रविवारी वनमंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला.पूजाच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या ऑडिओ क्लिप्समुळे संजय राठोड कमालीचे अडचणीत आले होते. सर्व बाजूंनी घेरले गेलेले राठोड हे रविवारी दुपारी सपत्नीक वर्षा बंगल्यावर गेले आणि त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.
दरम्यान, आज शिवसेना आमदार संजय राठोड यांच्या गच्छंतीवर अखेर आता शिक्कामोर्तब झाले आहे. या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी सही केली असून तो आजच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होणार आहे.
दरम्यान, सध्या संजय राठोड यांच्याकडे असलेल्या मंत्रीपदाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवली आहे. मात्र आता विदर्भातून आमदार डॉ. संजय रायमूलकर व आशिष जयस्वाल यांच्या नावाची चर्चा आता मंत्रिपदासाठी सुरू झाली आहे. संजय रायमुलकर यांच्याशिवाय शिवसेनेचे माजीमंत्री रवींद्र वायकर आणि गोपी किशन बजोरिया यांची नावे सध्या आघाडीवर आहेत.
एका बाजूला या नावांची चर्चा असताना दुसऱ्या बाजूला आता भूम- परंडाचे आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा विचार करावा, अशी मागणी त्यांच्या शिवसैनिकांतून होऊ लागली आहे. सावंत हे उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यांचा विचार करून त्यांना मंत्रिपद दिल्यास जिल्ह्यातील शिवसेना वाढीबरोबरच विकासालाही गती मिळेल. पक्षप्रमुखांनी त्यांचा विचार करावा अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. ही मागणी जरी केली जात असली तरीही सावंतांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी असल्याचे दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारला लाज वाटायला हवी’ इंधन दरवाढीवरून प्रकाश राज आक्रमक !
- उद्धव ठाकरेंना बाबरी बाबतचं ‘ते’ वक्तव्य भोवणार ? अबू आझमींनी दिला इशारा
- …अन् विरोधी पक्षनेत्यांनी केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन !
- पूजा चव्हाण प्रकरणात आणखी एक ट्वीस्ट; भाजपच्या ‘या’ नेत्याने पूजाचा लॅपटॉप चोरल्याची चर्चा
- शिवसेना आमदार,ठाण्याच्या महपौरांसह वरळीत इंडिया बुलच्या कर्मचाऱ्यांनी गैरमार्गाने कोरोना लस घेतली?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
