मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणामुळे संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, हे प्रकरण अजून तापलेलेचं आहे. मंत्रिपदावरून हकालपट्टी न केल्यास अधिवेशनाचे कामकाज होऊ देणार नाही असा इशारा भाजपने दिला होता. त्यामुळे अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच २८ फेब्रुवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा घ्यावा लागला. मात्र, यानंतरही विधीमंडळात संजय राठोड प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारला टार्गेट करणे सुरूच आहे. बीड जिल्ह्यातील भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनीही पूजा चव्हाण प्रकरणावरून टोलेबाजी केली. काय म्हणाले वाचा, त्यांच्याच शब्दांत.
”काय तुमची गेली काय सांगावं? लहान लहान लेकरं सुध्दा म्हणतात तो आवाज पुजा चव्हाणचा आहे. मी लहानपणी शोले चित्रपट बघितला होता. त्या पिक्चरमधील गब्बर पण ठाकूरला सापडला. पण या राज्यातला गबरू कोण आहे? या सरकारला गबरू कसा सापडत नाही. असा कसा गबरू आहे. तो आम्ही केवळ किल्पवरच ऐकतोय. गबरूशेठ प्रकरणाने खूप चुकीचा पायंडा पाडलेला आहे. एखाद्या समाजाचा आधार घेऊन आमच्या मागे समाज आहे म्हणून काही पण करायचं का? असा सवाल विधान परिषद सदस्य आ.सुरेश धस यांनी सभागृहात काल उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले, या सरकारला खरं तर नोबेल पुरस्कारच द्यायला हवाय. आम्ही पोहोरादेवी, सेवालाल महाराज, रामराव महाराजांना आम्ही पण मानतो, पण तुम्हाला विनंती करतो की असे गबरू शेठ पुढे होऊ देऊ नये. आधीच आमच्या बीड जिल्ह्याचं नाव प्रत्येक क्षेत्रात येत आहे. इंटरनॅशनल स्तरावर नाव चर्चीले जात आहे असेही धस यांनी सांगितले.
दरम्यान, पूजा चव्हाण हिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यातील एका फोटोमध्ये ती केकसोबत दिसत आहे. त्या केकवर गबरू असे नाव लिहिलेले आहे. तोच धागा पकडून गबरू या नावाने सोशल मीडियावर संजय राठोड यांचा उल्लेख होत आहे. सुरेश धसांनीही विधानपरिषदेत गबरू शब्द वापरल्याने त्यांचा रोख कोणाकडे आहे हे स्पष्ट झाले.
महत्वाच्या बातम्या
- लक्षवेधक! शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विधीमंडळात आंदोलन
- सावधान! पाणी जपून वापरा, ‘या’ धरणाची पाणी पातळी खालावली
- धनंजय मुंडेंना धक्का, ‘या’ ठिकाणी नमिता मुंदडा यांचे पुन्हा एकदा वर्चस्व
- एसटी अधिकाऱ्याला शिवीगाळ; ‘वंचित’च्या जिल्हाध्यक्षांना ठोकल्या बेड्या
- कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी‘एसओपी’ लागू, अजित पवारांची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
