Share

तुमच्या नावाने मुस्लिमांना घाबरवलं जातं; योगी आदित्यनाथ म्हणतात…

Published On: 

लखनऊ : राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सामाजिक तेढ निर्माण करून त्यावर राजकीय पोळी भाजली जात असल्याचा आरोप नेहमीच उत्तर प्रदेशमधील राजकीय पक्षांवर केला जातो. भाजपवर देखील यावरून टीका केली जाते. एका वृत्तवाहिनीवर सुरू असलेल्या मुलाखतीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ‘तुमच्या नावाने मुस्लिमांना घाबरवलं जातं’, याबाबत विचारलं असता योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या उत्तराची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

मुलाखत सुरू असताना न्यूज अँकरने योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या सरकारवर होत असलेल्या आरोपांविषयी प्रश्न विचारला. उत्तर प्रदेशमध्ये तुमच्या नावाने मुस्लमिमांना घाबरवलं जातं, आम्हाला मत द्या नाहीतर योगी (आदित्यनाथ) येतील असं सांगितलं जात, यावर न्यूज अँकरनं योगी आदित्यनाथ यांना विचारणा केली. त्यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

माझ्या नावावर कुणालाही घाबरण्याची गरज नाही. जो कुणी कायद्याचे पालन करेल, कायद्याच्या राज्यावर ज्याचा विश्वास असेल, त्याला अत्यंत सन्मानाने आणि गौरवाने उत्तर प्रदेशमध्ये राहाण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण कुणी कायदाच पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो कुणीही असला तरी त्याच्यावर कायदा कारवाई करेलच, असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.

दरम्यान, जे कायदा पायदळी तुडवत होते, उत्तर प्रदेशमध्ये दंगली घडवत होते, आया-बहिणींच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण झाले होते, व्यापाऱ्यांसाठी धोका ठरले होते, उत्तर प्रदेशमधल्या लोकांना पळायला लावत होते त्यांच्यावरच गेल्या 5 वर्षांत उत्तर प्रदेशमधून पळ काढण्याची वेळ आली आहे. जर कुणी याला जातिधर्माशी जोडू पाहात असेल, तर ते त्यांचं मत असेल. उत्तर प्रदेशच्या सामान्य रहिवाशांचे नाही, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!