Share

‘ममतांच्या मनात आधीपासून आहे की काँग्रेसने नेतृत्व करु नये पण…’

Published On: 

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांच्या 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यानंतर राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. यूपीए म्हणजे काय? आता युपीए नाही, असं वक्तव्य ममता बॅनर्जींनी मुंबईमध्ये केलं. यावरुन 2024 पूर्वी राष्ट्रीय राजकारणात नव्या प्रकारचा प्रयोग होण्याची चिन्हे आहेत.

ममता बॅनर्जी या काँग्रेस (Congress)च्या नेतृत्वाखालील यूपीएचे अस्तित्व पूर्णपणे नाकारत आहे. पण काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी मोदी-शहा यांच्या भाजपला तोंड देऊ शकत नाही, असे काँग्रेसकडून बोलले जात आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

ममता बॅनर्जी या देशातील मोठ्या नेत्या आहेत. भाजप (BJP) विरुद्ध जो लढा सुरु आहे त्यामध्ये महत्त्वपूर्ण लढा त्या देत आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममतांनी ज्याप्रकारे संघर्ष करुन विजय मिळवला तो प्रेरणादायी आहे. तसेच महाराष्ट्रात निवडणुकांनंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तीन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सरकार बनवले, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

काँग्रेससोबत मिळून काम केले तर चांगली आघाडी तयार होईल. यूपीए महाराष्ट्रामध्ये आहे. महाविकास आघाडी त्याचेच प्रतिक आहे. ममतांनी त्यांचे मत मांडले आहे. आम्ही त्यांचा आदर करतो. या गोष्टी सर्व आपल्याला विसरून जायला हव्यात. महाराष्ट्रातही आम्ही एकमेकांवर अनेक टीका करतो. पण भाजपला थांबवण्यासाठी आम्ही एकत्र आहोत आणि 2 वर्षांपासून आमचे सरकार चालत आहे. आम्ही एकत्र येवून काम करु शकतो हा आदर्श आम्ही देशासमोर उभा केला आहे. आता युपीएला सोनिया गांधी चालवत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वावर कोणी आक्षेप घेतलेला नाही. ममतांच्या मनात आधीपासून आहे की काँग्रेसने नेतृत्व करु नये पण संवादातून मार्ग निघेल, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राच्या राजकारणाने देशाला एक दिशा दिली आहे. युपीए कुठे आहे हा ममतांचा प्रश्न योग्य आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही वारंवार हाच प्रश्न विचारला आहे. जर युपीए नाही तर एनडीएसुद्धा कुठे आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. पण 2024 साठी वेगळी आघाडी उभी राहत असेल त्याचा काय फायदा होईल याचा विचार करायला हवा. जी आघाडी आधीपासून आहे त्याला आणखी मजबूत करा, असे आमचे म्हणणे आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!