Share

पुण्यात फक्त पेशव्यांचा शनिवारवाडाच नाही तर…- अमोल कोल्हे

Published On: 

पुणे : अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे(Amol Kolhe) हे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे आणि ट्विटमुळे चर्चेत असतात. यंदाही ते आपण केलेल्या अशाच एका ट्विटमुळे चर्चेत आले आहेत. पुणे विमानतळावर असलेल्या शनिवारवाडा तसेच पेशव्यांच्या चित्रांवर कोल्हे यांनी आक्षेप घेतला असून त्यावरुन आता कोल्हेंवर निशाणा साधण्यात येत आहे.

पुणे विमानतळावरचे काही फोटोज आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर करत कोल्हे म्हणाले आहेत की, ‘पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे, सिंहगडही आहे आणि याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे याचा पुणे विमानतळ प्रशासनाला विसर पडला की काय?’

दरम्यान, कोल्हेंच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांकडून त्यांना वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. यातील एका युजरने म्हंटले आहे की,’तुम्हा लोकांना महाराष्ट्रात बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे ते दिसत नाही का? सरळसेवा भरती केव्हा करणार? केव्हा नोकर भरतीचा नवीन जाहिराती काढणार? काम न करता फक्त भावनिक गोष्टी करून तुम्हाला मत पाहीजेत का? जर शिवाजी महाराजांना खरच मानता तर सामान्य जनतेसाठी काम ही करा.’तसेच ‘तुम्ही प्रसिद्धीसाठी महाराजांवर मालिका केलीत त्यात वढू तुळापूर दाखवलं का?’ असा सवालही एका युजरने विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!