Share

“सोनिया मॅडम चिडतील या भीतीने उद्धव ठाकरे…”, भातखळकरांचा टोला

Published On: 

मुंबई:एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलेल्या आघाडी ऑफर नंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यामुळे पुन्हा एकदा भाजप-सेना वाद सुरु झाल्याचे दिसून येत आहे. भाजपने यावरून शिवसेनेला हिंदुत्वावरून धारेवर धरले आहे, तर मुख्यमंत्री ठाकरे यांनीही आज भाजपला सडेतोड उत्तर दिले आहे. आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा सेनेला ट्वीट करत डिवचले आहे.

“सोनिया मॅडम चिडतील या भीतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंती-पुण्यतिथीला अभिवादन न करणारे उद्धव ठाकरे लाचारीबद्दल बोलतायत.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. तसेच लाचारी आणि शिवसेना हे समानार्थी शब्द बनलेत, हे उद्धव ठाकरेंचे कर्तृत्व असून उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी आहेत, फक्त ते अजान स्पर्धा भरवतात आणि टिपू जयंती साजरी करतात. असा टोलाही भातखळकर यांनी लगावला आहे.

दरम्यान कारण नसताना एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिली आहे. काही संबंध आहे का? हाच खऱा डाव आहे. एमआयएने ऑफर द्यायची आणि मग नंतर भाजपाने यावरुन टीकेचा भडीमार सुरु करायचा. औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकतात त्यांच्यासोबत मेलो तरी जाणार नाही इतकी कडवट निष्ठा असताना उगाच हा मुद्दा काढायचा आणि आम्ही हिंदुत्वापासून दूर चाललो आहोत हे दाखवायचं. आम्ही काय मूर्ख नाही. असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!