Share

IND vs SL : बंगळुरुच्या खेळपट्टीबाबत ICCनं दिला मोठा निर्णय; केली कडक कारवाई!

Published On: 

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना (IND vs SL) बंगळुरू येथे खेळला गेला. डे-नाइट रंगलेल्या या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले आणि विजय मिळवला. आता या सामन्याच्या खेळपट्टीबाबत आयसीसीकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. आयसीसी सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी चिन्नास्वामीची खेळपट्टी सरासरीपेक्षा वाईट असल्याचे म्हटले आहे आणि या खेळपट्टीला एक डिमेरिट गुण दिला आहे.

या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या डावात २५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या १०९ धावांत आटोपला. दुसऱ्या डावात भारताने ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकांच्या जोरावर ९ बाद २०३ धावा केल्या आणि श्रीलंकेसमोर ४४७ धावांचे लक्ष्य ठेवले. दिमुथ करुणारत्नेच्या शतकानंतरही पाहुण्या संघाला २०८ धावाच करता आल्या आणि सामना २३८ धावांनी गमवावा लागला.

सुधारित आयसीसी खेळपट्ट्या आणि आऊटफिल्ड मॉनिटरिंग प्रक्रियेनुसार, ज्या ठिकाणच्या खेळपट्ट्यांना सामनाधिकार्‍यांनी सरासरीपेक्षा कमी रेट केले आहे त्यांना एक डिमेरिट पॉइंट मिळतो, तर ज्या खेळपट्ट्यांना अनुक्रमे तीन आणि पाच डिमेरिट गुण दिले जातात, त्यांना खराब आणि अयोग्य म्हणून चिन्हांकित केले जाते. डिमेरिट गुण पाच वर्षांच्या कालावधीसाठी सक्रिय राहतात आणि जर डिमेरिट गुणांची संख्या पाचपेक्षा जास्त असेल, तर १२ महिन्यांच्या कालावधीसाठी कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आयोजन करण्यापासून ते ठिकाण निलंबित केले जाते.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!