🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणी महापालिका निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. ज्या ठिकाणी निवडणुका झालेल्या नाहीत तेथे सध्या आयुक्तच प्रशासकपदाचा कार्यभार सांभाळत आहेत. या पार्श्वभूमीवर आज (दि.१) राज्यात विषाणूजन्य आजाराचा प्रार्दुभाव असल्याने मुदत संपलेल्या व निवडणूक न झालेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३० एप्रिल २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये सुधारणा करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यासह स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त प्रशासकांना ३० एप्रिल पर्यंत आणखी मुदतवाढ मिळाली असून २ महिने औरंगाबाद मनपा निवडणूक लांबणीवर पडली आहे.
राज्य शासनाने महापालिकेवरील प्रशासकांना पुन्हा दोन महिन्यांची मुदतवाढ दिल्याने एप्रिल अखेरपर्यंत महापालिकेवर प्रशासक नियुक्त असतील. त्यामुळे एप्रिल पर्यंत महापालिकेची निवडणूक होणार नसल्याचे, आता स्पष्ट झाले आहे. औरंगाबाद महापालिकेबरोबरच आठ महापालिकांची पोटनिवडणूक देखील होणार आहेत. या सर्व निवडणुका कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाच्या सूचनेवरून राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक देखील त्यात पुढे ढकलण्यात आली.
निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या महापालिकांवर राज्य शासनाने सुरुवातीला सहा महिन्यांसाठी प्रशासकांची नियुक्ती केली. त्यानंतर कोरोना संसर्ग वाढतच गेला आणि प्रशासकपदाला वरचेवर मुदतवाढ देण्यात आली. महापालिकेच्या वॉर्ड आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. येत्या ९ मार्चला याची सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र आता प्रशासक पदाला मिळालेल्या वाढीनंतर निवडणुका देखील लांबणीवर पडल्याचे संकेत मिळाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- त्यादिवशी मुंबई अंधारात गेली, तो घातपातच होता : ऊर्जामंत्र्यांचा दावा
- जेष्ठांच्या रांगेत माजी महापौर आणि नगरसेवक
- अजित पवार आणि ठाकरे सरकारला विदर्भ-मराठवाड्यातील लोकांबद्दल आकस आहे का ?
- ‘अब होगी हलक्रांती’, ४० लाख ट्रॅक्टर घेऊन तयार रहा; टिकैत यांनी दिल्या सूचना
- संगीतकार सलील कुलकर्णी यांनी पटकावला पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शंनाचा फिल्मफेअर पुरस्कार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
