Share

त्यादिवशी मुंबई अंधारात गेली, तो घातपातच होता : ऊर्जामंत्र्यांचा दावा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईत झालेल्या ‘पॉवर कट’मध्ये चीनचा हात असल्याचा दावा अमेरिकेतील एका प्रसिद्ध दैनिकानं केला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ‘तो घातपातच होता’, असं राऊत यांनी आज स्पष्ट केलं. या संदर्भातील सायबर सेलचा अहवाल आज जाहीर करण्यात येणार आहे.

राजधानी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा वीजपुरवठा १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता खंडित झाला होता. त्यानंतर अडीच ते तीन तासांनी वीज पुरवढा सुरळीत व्हायला सुरुवात झाली. राज्यात कोरोनाचं संकट असल्याने हॉस्पिटल्समधल्या वीज पुरवढ्याबाबत प्रशासन चिंतेत होतं.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित सर्व विभागांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले होते. त्यानंतर, आता मुंबईतील वीजपुरवठा खंडीत होणं हे घातपात असल्याचा निष्कर्ष हाती आला आहे.

मागील वर्षी १२ ऑक्टोबरला मुंबईत सकाळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. त्याचा मोठा फटका रुग्णालये, शेअर बाजार व अन्य सेवांना बसला होता. तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हा वीज पुरवठा सुरळीत झाला होता. यामागे काही घातपाताचा संशय असावा, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालामुळं ही शक्यता खरी ठरली आहे. त्या ‘पॉवर कटमध्ये चीनचा हात होता. गलवान खोऱ्यातील संघर्षाची किनार या घातपातास होती, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी उर्जा विभागाचं टेक्निकल ऑडिट करण्याचेही आदेश आजच्या बैठकीत दिले होते. वीज पुरवठा खंडीत झाल्याप्रकरणी काही बेजबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते. तसेच, असा प्रकार पुन्हा घडू नये याचीही काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!