Share

Yogesh Kadam : “राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना संपवू नये यासाठी…”; बंडखोर आमदार योगेश कदम यांचं ट्विट चर्चेत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडीमुळे ठाकरे सरकार अडचणीत सापडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांचाच पक्षातील आमदारांनी धक्का दिला आहे. उद्धव ठाकरेंचा उजवा हाथ समजले जाणारे एकनाथ शिंदे यांनी सेनेशीच बंड पुकारला आहे. त्यांच्याबरोबर सेनेचे जवळपास ४६ आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यानंतर काल शिंदे गटातील बंडखोर आमदार योगेश कदम यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधलाय.

ट्विटमध्ये कदम म्हणाले कि “सप्रेम जय महाराष्ट्र, मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं..! भाजपामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही.. मुळात तशी गरज ही पडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठी उचललेले हे पाऊल येणाऱ्या काळात शिवसेनेला अधिक भक्कम करेल, असं ते म्हणालेत तसेच पुढे ही परिस्थिती मावळल्यावर दापोली मतदारसंघात शिवसेनेचा भगवाच हातात घेऊन येईल. संयम बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका. मी शिवसैनिक!,” असं देखील योगेश कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी मेलो तरी शिवसेना सोडणार नाही म्हणणारे पळून गेले. भाजपसोबत जायला पाहिजे म्हणून काहींचा दबाव आहे पण मी शांत आहे. संजय राठोड यांच्यावर वाईट आरोप होऊनही मी त्यांना सांभाळलं. काहींनी मी बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. तसेच जे सोडून गेले त्यांचं मला वाईट का वाटावं? झाडाची फुलं न्या, फांद्या न्या, पण तुम्ही झाडाची मुळं नेऊ शकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!