🕒 1 min read
औरंगाबाद : १ मार्च पासून औरंगाबाद महानगरपालिके तर्फे शहरातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्याची सुरुवात करण्यात आली. महापालिकेच्या बन्सीलालनागर, एन-११ आणि एन-८ या आरोग्य केंद्रांवर लसीकरणास सकाळी १० पासून सुरुवात करण्यात आली. माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी पदाधिकारी गजानन बारवाल, माजी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांचा लस घेणाऱ्यात समावेश होता.
ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारन १ मार्चपासून कोरोना लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने तयारी करण्याची सूचना केली आहे. याअंतर्गत पालिकेने शहरातील ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिकांसह इतर आजार असलेल्या ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांना कोरोना लस देण्याची तयारी पूर्ण केली आहे. पालिकेच्या बन्सीलालनगर, सिडको एन-११ आणि एन-८ मधील आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू केले आहे.
जेष्ठ नागरिकांसह इतर आजार असलेल्या नागरिकांनी लसीकरणासाठी आरोग्य केंद्रात यावे. येतांना सोबत जन्म तारखेसह रहिवासी असलेला पुरावा म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र सोबत आणावे. आरोग्य केंद्रात कोविन अॅपद्वारे त्यांची नोंदणी करुन पडताळणी केली जाईल. त्यानंतर त्यांना लस देण्यात येईल.
औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाणडेय यांनी आज बन्सीलालनागर आरोग्य केंद्रास भेट दिली आणि तेथील लसीकरणासाठी आलेले नागरिकांना पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी घोडेले, बारवाल आणि भापकर यांनी ज्येष्ठ नागरिकांना आवाहन केले की कोरोना लस पूर्णपणे सुरक्षित असून त्यांनी पुढे येऊन लस घ्यावी. आम्ही लस घेतली आहे, तुम्ही पण घ्या आणि प्रशासनाशी सहकार्य करा.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अब होगी हलक्रांती’, ४० लाख ट्रॅक्टर घेऊन तयार रहा; टिकैत यांनी दिल्या सूचना
- दरवाढीविरोधात ‘शेणाच्या गोवऱ्यावर स्वयंपाक’ आंदोलन
- संगीतकार सलील कुलकर्णी यांनी पटकावला पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शंनाचा फिल्मफेअर पुरस्कार
- मोदीभक्तीची पट्टी डोळ्यावर बांधल्याने भाजप नेत्यांना इंधनदरवाढ दिसत नाही – बाळासाहेब थोरात
- शिष्यानंतर गुरूचा नंबर ; शरद पवारांनी घेतली कोरोना लस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
