Share

संगीतकार सलील कुलकर्णी यांनी पटकावला पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शंनाचा फिल्मफेअर पुरस्कार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : प्रख्यात संगीतकार कवी ‘सलिल कुलकर्णी’ (वेडींग चा शिनेमा) यांनी अपल्या दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात पदार्पनातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार तर आनंदी गोपाळ ने पटकावला. तर सर्वोत्कृष्ट नायकाचा फिल्मफेअर हिंदी चित्रपटातील अभिनेते दीपक डोबरीयाल यांना ‘बाबा’ साठी मिळाला आहे.

आभिनेत्रीमध्ये मुक्ता बर्वेने (स्माइल प्लिज) पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची कमाल दाखवत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला आहे. सलील कुलकर्णी यांनी फिल्मफेअर पुरस्कारासोबत आपला फोटो शेअर करताना जुनी आठवण काढली आहे. यात ते म्हणाले की ‘हा पुरस्कार मला माझा २००३ साली मिळालेल्या ‘विठ्ठल विठ्ठल’ साठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराच्या पहिल्या पुरस्काराची आठवण करुन देत आहे.’

इतर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट गितकार क्षीतिज पटवर्धन -तुला जपणार आहे (खारी बिस्कीट) साठी तर, सर्वोत्कृष्ट गायक आदर्श शिंदे (तुला जपणार आहे- खारी बिस्कीट) , सर्वोत्कृष्ट गायीका शाल्मली खोलगडे (केरीदो कोरीदो) साठी मिळाला आहे. समिक्षकांच्या पुरस्कारात ललीत प्रभाकर (सर्वोत्कृष्ट अभिनेता- आनंदी गोपाळ), सोनाली कुलकर्णी(हिरकणी), भाग्यश्री मिलींद(आनंदी गोपाळ) – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (विभागुन) देण्यात आला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!