Share

Deepali Sayed : “शालिनी बाई उगाच कळ काढु नका, तुमचे मामु बरे होण्याआगोदरच पक्ष सपाट होईल तुमचा”

Published On: 

मुंबई : शिवसेनेतील अनेक आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील होत आहेत. तसेच शिंदे गटाचं संख्याबळ देखील वाढताना दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

“स्वतःच्या पक्षात केमिकल लोच्या कधी झाला, हे कलानगरच्या सर्किटला समजलेच नाही.”, असे ट्वीट शालिनी ठाकरे यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी सेनेच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांचा केमिकल लोच्या झाल्याचे म्हटले होते. आता शालिनी ठाकरे यांनी सेनेच्या परिस्थितीवर बोट ठेवत टोला लगावला आहे.

यानंतर आता शालिनी ठाकरे यांच्या या टीकेला शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. शालीनी बाई झटक्याचे नाव म्हणजे ब्रिजभूषण हे विसरू नका मताधिक्याची गोष्ट करू नका, उरलेला शिलेदार शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहे आणि सरकार शिवसेनेचे असणार आहे. उगाच कळ काढु नका तुमचे मामु बरे होण्याआगोदरच पक्ष सपाट होईल तुमचा. तुमची मत किती तुम्ही बोलता किती! , असं म्हणत सय्यद यांनी शालिनी ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतलाय.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!