Share

Aaditya Thackeray- वर्षा बंगला सोडताना आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई भावनिक

Published On: 

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील नाराजीनाट्य अजूनतरी मिटताना दिसत नाहीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी भावनिक आवाहन करुनही एकनाथ शिंदे परत आलेले नाही आहे. हे पाहून मुख्यमंत्र्यांनी शासकिय निवासस्थान ‘वर्षा’ बंगला सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा सोडले आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ला जय महाराष्ट्र केला आहे. ते आता मातोश्रीला जाणार आहेत. वर्षा बंगला सोडतांना आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई भावनिक झाल्याचे दिसले.

यावेळी वर्षा बाहेर अनेक शिवसैनिक जमले होते .  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुष्प वर्षाव करण्यात आला. कार्यकर्ते हे भावनिक झाल्याचे चित्र बघायला मिळाले. शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. मुख्यमंत्रीही शिवसैनिकांचं प्रेम पाहून भारावून गेले, त्यांच्या डोळ्यात पाणी आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना अभिवादन करत मातोश्रीच्या दिशेने निघून गेले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोड्या वेळापूर्वी लाईव्ह येत आपल्या मुख्यमंत्रीपदाबाबत खुलासा केला आहे. मला कोणताही मोह नाही, मी राजीनामा द्यायाल तयार आहे. परंतु, ज्यांना मी नकोय त्यांनी माझ्या समोर येऊन बोला. समोर येऊन बोललात तर संध्याकाळी देखील राजीनामा देतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच मी मुख्यमंत्री पद आणि पक्षप्रमुखपद देखील सोडायला तयार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंद आहे. पण समोर येऊन सांगा… मी आव्हानांना तोंड देणारा माणूस आहे, असं ते लाईव्हमध्ये बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!