🕒 1 min read
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती दिल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता राज्य निवडणूक आयोगानेही ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेवून इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आता भाजप (BJP)चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ओबीसींच्या आरक्षित जागा वगळून अन्य जागांवरील निवडणूक घेता येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे गंभीर पेच निर्माण होणार असून आयोगाने ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सर्वच जागांवरील निवडणूक रद्द केली पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
न्यायालयाने ही निवडणूक घेतलीच पाहिजे असे काही म्हटले नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या 27 टक्के जागा वगळून ऊर्वरित 73 टक्के जागांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेऊ नये. अशा निर्णयामुळे केवळ सामाजिकच नाही तर गंभीर राजकीय पेच निर्माण होत आहे. आयोगाने सर्वच निवडणूक प्रक्रिया रद्द करावी, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, ओबीसींच्या जागा वगळून निवडणूक घेतली तर ओबीसी आरक्षणाचा निर्णय होऊन त्या जागांवर कधी निवडणूक होणार याबद्दलही अनिश्चितता आहे. एकूण या बाबी ध्यानात घेता निवडणूक आयोगाने राज्यात सध्या चालू असलेली सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राजकारण करण्यासाठी ओबीसी आरक्षणाचे लचके तोडत आहेत; संभाजी ब्रिगेडचा आक्रमक प्रतिक्रिया
- राजकारणात लगीन सराई; हर्षवर्धन पाटील-ठाकरेंची जुळली सोयरीक
- नगरसेवकांची संख्या वाढविण्याच्या अध्यादेशास खंडपीठात आव्हान; ‘मनसे’च्या सुहास दाशरथेंचा आक्षेप!
- शिवसेनेत अंतर्गत वाद; माजी जिल्हाप्रमुखांचा माजी महापौरांवर भ्रष्टाचाराचा आरोप!
- रजिस्टर लग्न करत जितेंद्र आव्हाडांच्या मुलीने सर्वांपुढेच ठेवला एक चांगला आदर्श
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
