मुंबई : सध्या राजकारणात लगीनसराई सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीचे लग्न पार पडले. त्यानंतर 1 डिसेंबर रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मुलीचे लग्न झाले. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटीलांच्या घरी देखील नुकताच विवाह सोहळा पार पडला. आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला. आव्हाडांच्या मुलीच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यातच आता माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या कन्या अंकिता या आता ठाकरे घराण्याची सून होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
निहार बिंदूमाधव ठाकरे यांच्याशी येत्या 28 डिसेंबर रोजी त्यांचा विवाह होणार आहे. अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. तर निहार यांचे एलएलएमपर्यंत शिक्षण झाले असून त्यांनी वकिली व्यवसायामध्ये जम बसविला आहे. अंकिता यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आणि एक वर्ष हार्वर्डमध्येही शिक्षण घेतले आहे.
इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या अंकिता पाटील सदस्या आहेत. गेले काही दिवस या दोघांच्या विवाहाची चर्चा होती. त्याची अधिकृत माहिती आज जाहीर झाली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांची या निमित्ताने भेट घेतली आणि त्यांना विवाहाचे निमंत्रण दिले.
मुंबईत येत्या 28 डिसेंबर रोजी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा होणार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. 17 डिसेंबर रोजी विवाहाच्या निमित्ताने पाटील यांचे मूळ गाव असलेल्या बावडा येथेही गावकऱ्यांसाठी थाटामाटाने भोजनसोहळा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
आज मा.श्री. राजसाहेब ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेतली.@RajThackeray pic.twitter.com/sX6GGIWQCQ
— Ankitta Patil Thackeray (@iankitahpatil) December 7, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- रजिस्टर लग्न करत जितेंद्र आव्हाडांच्या मुलीने सर्वांपुढेच ठेवला एक चांगला आदर्श
- शासकीय जिल्हा समित्यांच्या यादीत घोळ; नाना पटोलेंकडून निवडीला स्थगिती!
- कोरोना काळात आशा सेविकांनी केलेले कार्य कौतुकास्पद- आ. प्रदिप जैस्वाल
- ’54 टक्के ओबीसी समाजावर अन्याय होणार, न्यायालयीन लढाई चालूच’
- पुन्हा वानखेडेंबाबत बोलाल तर… ; न्यायालयाने दिला मलिकांना कारवाईचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

