औरंगाबाद : राज्यातील सर्व महानगरपालिका तसेच तसेच नगरपालिकांमधील नगरसेवकांची संख्या वाढविण्याच्या राज्य शासनाच्या अध्यादेशास मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे(Suhas dashrathe) यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. याबाबत न्यायालयाने प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले, पुढील सुनावणी दिनांक १२ जानेवारी रोजी होणार आहे. कोविड महामारीमुळे २०२१ सालच्या जनगणनेचे अधिकृत आकडे उपलब्ध नाहीत. शहरी लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येत आहे.
वाढलेल्या लोकसंख्येस प्रतिनिधित्व देण्याचे नमूद करुन राज्य शासनाने २ नोव्हेंबर २०२१ रोजी अध्यादेश जारीकेला. सदर अध्यादेशाद्वारे मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महानगरपालिका तसेच नगरपालिकांमधील नगरसेवकांची संख्या वाढवण्याची तरतूद राज्य शासनाने केली होती. मात्र, सदर अध्यादेश असंवैधानिक तसेच कायदेशीर तरतुदींचा भंग करणारा असल्याने तो रद्द करावा अशी विनंती करणारी याचिका सुहास दाशरथे यांनी अॅड. देवदत्त पालोदकर(Devadatt palodkar) यांच्यामार्फत सादर केली आहे.
काय आहेत मनसेचे आक्षेप ?
सदर याचिकेमध्ये महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, जनगणना आयुक्त तसेच औरंगाबाद महानगरपालिकेस प्रतिवादी करण्यात आले आहे. यापूर्वी अनेक वेळा जनगणनेचे आकडे प्रसिद्ध होण्यासाठी विलंब झाला आहे. तथापि उपलब्ध असलेल्या जनगणनेच्या आकड्यांवरूनच राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी निवडणुका घेतल्या आहेत. यावर्षीसुद्धा राज्य निवडणूक आयोगाने शेकडो ग्रामपंचायती तसेच नगरपंचायतींच्या निवडणुका जुन्या जनगणनेच्या आकड्यानुसार घेतलेल्या आहेत.
जर जनगणनेचे आकडे उपलब्ध नसतील तर जुन्याच जनगणनेच्या आकड्यावर प्रभागरचना करावी व निवडणुका घेण्यात याव्यात, अशी स्पष्ट तरतूद महानगरपालिका कायद्यामध्ये केलेली आहे. त्याचप्रमाणे केवळ नगरसेवकांची संख्या वाढवून प्रतिनिधित्व दिले असे होत नाही, तर त्यासाठी लोकसंख्येच्या प्रगणक गटांची आकडेवारी उपलब्ध असावी लागते. त्याआधारेच विविध वर्गांच्या आरक्षणाची निश्चिती होते.
महत्त्वाच्या बातम्या
- निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवल्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस अडचणीत?
- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचे केंद्र सरकारला पत्र
- दुसऱ्याचे अडीच कोटी भरता, मग तुमची थकबाकी का भरत नाही?- दीपक केसरकर
- ‘राणेंना एवढे महत्त्व कशाला’; पेडणेकरांचा खोचक सवाल
- ‘तोंड दिलं म्हणून काहीही बोलू नका, अजित पवारांना जातीयवादी…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

