Share

रजिस्टर लग्न करत जितेंद्र आव्हाडांच्या मुलीने सर्वांपुढेच ठेवला एक चांगला आदर्श

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला आहे. अनेकजण हौसमौस करत मोठ्या थाटामाटात आपल्या मुलांची लग्न करताना आपण पाहतो. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची कन्या नताशा हिचे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने लावले आहे.

जितेंद्र आव्हाडांचा जावई एलन पटेल हा त्यांची मुलगी नताशाचा बालमित्र आहे. इयत्ता पहिली पासूनच ते एकत्र शिकत होते. नताशाचे शिक्षण एमएस इन मँनेजमेंटमध्ये झालं असून एलन पटेलचे शिक्षण एमएस अन फायनान्स मँनेजमेंटमध्ये झाले आहे. एलन पटेल स्पेनमधली मल्टीनँशनल कंपनीत कामाला आहे. मुलीच्या इच्छेनुसार आव्हाड यांनी हे लग्न साधेपणानं केले असून मतदारसंघातील लोकांसाठी लग्नाचे रिसेप्शन ठेवले जाणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या मुलीच्या लग्नाची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. रजिस्टर पद्धतीने करण्यात आलेल्या या लग्नात काही मोजकेच पाहुणे उपस्थित होते. 25 वर्ष आपल्या अंगा खांद्यावर खेळलेली मुलगी आता आपल्या घरात नसणार ही भावनाच खूप वेदनादायी आहे. या कठीण वेळी एखाद बाप काय बोलणार, असे म्हणत जितेंद्र आव्हाड अश्रू पुसत म्हणाले.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1468131352998514688?s=20

किताही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला तरी मन तयार होत नाही. आपल्यावर प्रेम करणारी, वेळेप्रसंगी ओरडणारी मुलगी उद्या घरात नसणार म्हणजे घराचं घरपणच जाणार. लग्न साध्या पद्धतीने व्हावे ही मुलीचा इच्छा होती म्हणूनच या पद्धतीने लग्न करण्यात आले आहे. अशी माहिती देखील जितेंद्र आव्हाड यांनी या वेळी दिली आहे.

दरम्यान, लग्नसोहळ्यासाठी होणारा शाही थाट दूर करत आव्हाड यांच्या कन्येचे शुभमंगल अवघ्या 10 ते 15 लोकांमध्ये पार पडलं. हे लग्न पारंपारिक पद्धतीऐवजी नोंदणी पद्धतीने करण्यात आले. विवाह प्रमाणपत्रावर वधूवरांनी सही करत कायदेशीर प्रक्रिया पार पाडली. मुलीच्या इच्छेप्रमाणं रजिस्टर मॅरेज केल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!