औरंगाबाद : शहर विकास आराखड्यात २५० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून त्यात माजी महापौर त्र्यंबक तुपे(Trimbak tupe) यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राधाकृष्ण गायकवाड(Radhakrishna gaikwad) यांनी केला आहे. हे आरोप तुपे यांनी साफ शब्दात फेटाळले असून त्यात काडीचे तथ्य नसल्याचे म्हटले आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत ज्येष्ठ नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राधाकृष्ण गायकवाड यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Udhav thackrey) याना एक सहा पानी पात्र पाठवून त्र्यंबक तुपे यांच्याबद्दल थेट आरोप केले आहेत. गायकवाड यांनी त्या पात्रात म्हटले आहे की, शहरातील काही धनाढ्य लोकांच्या आहारी जाऊन तुपे यांनी महापौर असताना विकास आराखड्यात जमिनीवर आरक्षण टाकणे, आरक्षण हटवणे यासाठी मनपातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून जवळपास २५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला.
एवढेच नव्हे तर शासनाच्या तज्ज्ञ समितीने केलेला आराखडा पदाचा दुरुपयोग करून रद्द केला. हा आराखडा रद्द करण्यासाठी तत्कालीन आयुक्तांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. यात आयुक्त प्रतिवादी असल्याने दोन्ही बाजूंच्या न्यायालयीन लढाईचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून करावा लागण्याचा एकमेव प्रकार घडला. त्यांच्या निवेदनात दुसरा आरोप तुपे यांनी भवानी नगर यथे शिवसेनेच्या शाखा कार्यालयाच्या जागेवर बेकायदेशीर दोन मजली घरचे बांधकाम करून ते किरायाने दिल्याचा आहे.
तुपेंकडून आरोपांचे खंडन
भवानी नगर येथे एका जागेवर अतिक्रमण करीत तेथे व्यायामशाळा बांधल्याचा देखील आरोप केला आहे. स्वत: त्र्यंबक तुपे यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. ते म्हणाले, राधाकृष्ण गायकवाड यांनी केलेले आरोप तथ्यहीन आहेत. आपण मनपाच्या नगर रचना विभागातील काही अधिकाऱ्यांना मुदतवाढ देऊ नये असे पत्र शासनाला दिले होते. त्यामुळेच या अधिकाऱ्यांनी गायकवाड यांना हाताशी धरून हे आरोप केले असल्याचे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवल्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस अडचणीत?
- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचे केंद्र सरकारला पत्र
- दुसऱ्याचे अडीच कोटी भरता, मग तुमची थकबाकी का भरत नाही?- दीपक केसरकर
- ‘राणेंना एवढे महत्त्व कशाला’; पेडणेकरांचा खोचक सवाल
- ‘तोंड दिलं म्हणून काहीही बोलू नका, अजित पवारांना जातीयवादी…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

