Share

पुजा चव्हाणसाठी फुलंब्रीत भाजपा रस्त्यावर

Published On: 

फुलंब्री: राज्यभरात गाजत असलेल्या पूजा चव्हाण मुत्युप्रकरणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज (दि.२७) फुलंब्री टी पॉईंटवर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध करण्यात आला. पुजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशी करून पुजा चव्हाणला न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. काही दिवसांपूर्वी पूजाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले होते. यानंतर महाविकास आघाडीमधील वनमंत्री संजय राठोड यांचा या मुलीशी संबंध असून काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले होते.

विरोधीपक्षाने मंत्री संजय राठोड यांच्यावर याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे राज्य सरकार कोंडीत सापडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांची बाजू ऐकूण घेतल्यानंतरही निर्णय घेतलेला नाही.

हा प्रकार कोणी दाबत असेल तर तो हाणून पाडु , संजय राठोड राजीनामा द्या, राजीनामा द्या या घोषणाबाजी करत फुलंब्री येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष सुहास शिरसाठ , महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा ऐश्वर्या गाडेकर, पंचायत समिती सभापती सविता फुके, भाजपा महिला जिल्हा महिला सरचिटणीस सुशीला फुके , मंगलताई वाहेगावकर, भाजपा ओबीसी आघाडीचे तालुका अध्यक्ष राम बनसोड , भाजपा शहराध्यक्ष योगेश मिसाळ , बाळासाहेब तादळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!