सिल्लोड : औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी ३ कोटी ३१ लाखाच्या अंदाजपत्रकीय आराखड्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा अनेक दिवसापासून ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाला निधी मिळावा म्हणून पाठपुरावा सुरू होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत इमारतीची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. त्या ठिकाणी सुसज्ज आणि अत्याधुनिक रुग्णालयाची इमारत बांधण्याचा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा मानस आहे.
त्या इमारतीसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून ते प्रयत्न करत होते. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाने ग्रामीण रुग्णालय रुग्णालयाच्या इमारतीत ३ कोटी ३१ लाखांचा अंदाजपत्रकीय आराखड्यास मान्यता दिली आहे.
अनेकांचे वाचणार प्राण
औरंगाबाद – जळगाव महामार्गावर अनेक अपघात होतात. या अपघातातील जखमींना योग्य वेळी उपचार न मिळाल्याने त्यातील अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. मात्र अजिंठ्यात अत्याधुनिक आणि सुसज्ज ग्रामीण रुग्णालयाची इमारत लवकरच उभी राहणार आहे. त्यामुळे जखमींचे प्राण वाचण्यात या ग्रामीण रुग्णालययामुळे आता मदत होणार आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या अंदाजपत्रकीय आराखड्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे
महत्त्वाच्या बातम्या
- पोलिसांवर चाकूने प्राणघातक हल्ला करणारा गजाआड
- ‘यांच्या जागी तुमची मुले असती तर काय केले असते?’ जितेंद्र आव्हाडांचा सवाल
- सोमवारपर्यंत संजय राठोड यांचा राजीनामा घ्या ; चंद्रकांत पाटीलांचा उद्धव ठाकरे यांना इशारा
- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या महिला वनडे आणि टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची संघ निवड
- बनावट कागदपत्राआधारे आरटीओ कार्यालयाची फसवणूक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
