मुंबई : भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच राज्य सरकारकडून मराठा समाजाने अपेक्षा ठेवू नये, असेही राणे म्हणाले आहेत.
यासंदर्भात निलेश राणे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘१५ मार्चपर्यंत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू असं ठाकरे सरकारचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावर सांगितले आणि आंदोलन मागे घ्यायला भाग पाडले. ‘
15 मार्चपर्यंत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू असं ठाकरे सरकारचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावर सांगितले आणि आंदोलन मागे घ्यायला भाग पाडला. त्यातली एकही मागणी पूर्ण झालेली नाही, किती बंडलबाज सरकार आहे. राज्य सरकारकडून मराठा समाजाने अपेक्षा ठेवू नये.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 24, 2022
दरम्यान, त्यापैकी एकही मागणी पूर्ण झाली नसून हे सरकार किती बंडलबाज आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मराठा समाजाने अपेक्षा ठेवू नये, असे निलेश राणे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- महावितरणमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध नितीन राऊतांनी उगारला कारवाईचा बडगा
- “धनंजय मुंडेंना स्वतःची IPL टीम बनवायची आहे वाटतं”, करुणा मुंडेंच्या ‘त्या’ आरोपांनंतर निलेश राणेंचा टोला
- उद्योगमंत्री सुभाष देसाईंना औरंगाबाद खंडपीठाचा दणका; नेमके कारण काय?
- ‘…तर मीच गुजरात फाईल्स काढला असता’, अमोल मिटकरींचे मोठे वक्तव्य
- Women’s WC 2022: पाकिस्तानच्या पराभवामुळे टीम इंडियाला मोठा झटका, इंग्लंडच्या विजयामुळे गुणतालिकेत मोठे बदल


