🕒 1 min read
मुंबई : राज्यातील मविआ नेत्यांवर होत असलेल्या ईडी कारवाईची राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसत आहे. ते म्हणाले की, “उद्या ‘ईडी’ने माझ्या मुलीला चौकशीला बोलावले तर ती आत्महत्या करेल तसेच महाविकास आघाडी घ्यायचा तो निर्णय घेईल पण मला विचाराल तर आता मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही.” यावरून आता भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टीका केली आहे.
यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘आपल्या कुकर्मांमुळे कधीतरी आपल्यावर कारवाई होईल या भीतीने काही जण आत्ताच आत्महत्येची धमकी देऊ लागलेत. ईमानदारी और सच्चाई का ये डर अच्छा है…ये डर होना जरुरी है’, असे पाटील म्हणाले.
आपल्या कुकर्मांमुळे कधीतरी आपल्यावर कारवाई होईल या भीतीने काही जण आत्ताच आत्महत्येची धमकी देऊ लागलेत…
ईमानदारी और सच्चाई का ये डर अच्छा है …ये डर होना जरुरी है !#ED
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 24, 2022
दरम्यान, राज्य सरकारकडून भाजप नेत्यांची चौकशी सुरु असली तरी कोणालाही तुरुंगात टाकले आहे का? चौकशी करणे आणि धाडी टाकणे यामध्ये फरक आहे. पण आता केंद्रीय यंत्रणा थेट घरात घुसल्या आहेत. यावर महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते चर्चा करतील. पण मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- राज्य सरकारकडून मराठा समाजाने अपेक्षा ठेवू नये- निलेश राणे
- “धनंजय मुंडेंना स्वतःची IPL टीम बनवायची आहे वाटतं”, करुणा मुंडेंच्या ‘त्या’ आरोपांनंतर निलेश राणेंचा टोला
- उद्योगमंत्री सुभाष देसाईंना औरंगाबाद खंडपीठाचा दणका; नेमके कारण काय?
- ‘…तर मीच गुजरात फाईल्स काढला असता’, अमोल मिटकरींचे मोठे वक्तव्य
- Women’s WC 2022: पाकिस्तानच्या पराभवामुळे टीम इंडियाला मोठा झटका, इंग्लंडच्या विजयामुळे गुणतालिकेत मोठे बदल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
