औरंंगाबाद : गाड्यांची तोडफोड करणाNयाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच माथेफिरूने चावूâने हल्ला करून जखमी केले. ही घटना २६ फेब्रुवारी रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास न्यु नंदनवन कॉलनी परिसरातील भुजबळनगरात असलेल्या चाँदमारी जवळ घडली.
सचिन उर्फ राजेंद्र अशोक भुजबळ (वय ३२, रा. न्यू नंदनवन कॉलनी, भुजबळनगर) असे माथेफिरूचे नाव असून त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी शुक्रवारी (दि.२६) दिले.
न्यु नंदनवन कॉलनी परिसरातील भुजबळनगरात असलेल्या चाँदमारीजवळ एक माथेफिरू वाहनांची तोडफोड करीत असल्याची माहिती शुक्रवरी पहाटे दोन वाजेच्या सुमारास पोलिसांना मिळाली.
या घटनेची माहिती मिळताच छावणी पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार राजू दत्तात्रय जाधव (वय ४३), बाळू पवार हे घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी सचिन उर्पâ राजेंद्र भुजबळ याने पोलिसांना चावूâचा धाक दाखवत समोर आलात तर खतम करून टाकेन अशी धमकी देत राजू जाधव यांना भोसकण्याचा प्रयत्न केला.
तसेच यावेळी भुजबळ याने बाळू पवार यांच्या दुचाकीची तोडफोड केली. दरम्यान, जमलेल्या नागरिकांनी पाठलाग करून सचिन उर्पâ राजेंद्र भुजबळ याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. वाहनांची तोडफोड करणाNया सचिन उर्पâ राजेंद्र भुजबळ याच्याविरूध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ख्रिस गेलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी टी-20 वर्ल्ड कपमध्ये गेलचे पुनरागम
- दारू विकणाऱ्यानेच दिली दारू विक्रीची तक्रार, मग काय? खाल्ला मार!
- सावधान! ‘या’ रुग्णांची माहिती लपवल्यास होणार २ वर्षांचा कारावास
- याजसाठी केला होता अट्टाहास, पण शेवट वाईट झाला! चित्रा वाघ यांचा भाजप प्रवेश निष्फळ?
- खाम स्वच्छता मोहीम,नव्या ‘स्मार्ट’ सीईओंची अनुपस्थिती


