Share

‘यांच्या जागी तुमची मुले असती तर काय केले असते?’ जितेंद्र आव्हाडांचा सवाल

Published On: 

मुंबई : मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह हे एका फोटोवरून वादात अडकले आहेत. अंमली पदार्थ विरोधी एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. वॉर ऑन ड्ग्स असे या कार्यक्रमाचे नाव होते. यावेळचा एक फोटो बिरेन सिंह यांनी त्यांच्या फेसबूवर पोस्ट केला आहे. या फोटोत काही विद्यार्थी मुख्यमंत्री येताना जमिनीवर डोके ठेवून त्यांच्यासमोर झुकलेले दिसतात. यावर मुख्यमंत्र्यांनी लिहिले आहे की, ”मी मणिपूर येथील नागरिकांच्या संस्कृती आणि परंपरा पाहून भारावलो आहे. त्यांच्यामध्ये कमालीची शिस्त आहे.”

दरम्यान, त्यांच्या या पोस्टवरून अनेकांनी टीका केली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्यावर निशाना साधला आहे.

त्यांनी ट्विटवर तोच फोटो शेअर करत म्हटले आहे की, ”हे आहेत भाजपचे ‘एन. बिरेन सिंग’ मणिपूरचे मुख्यमंत्री. आणि त्यांच्यापुढे झुकलेली आहेत ती शाळकरी मुलं. स्वतंत्र भारताचे भविष्यातले ताठ(?) कण्याचे नागरिक! विचार करा, या मुलांच्या जागी तुमची मुलं असती तर?  काय हे अपेक्षित आहे काय ? असा सवाल देखील आव्हाडांनी विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!