🕒 1 min read
मुंबई : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पूजा चव्हाण या तरुणीचा पुण्यात मृत्यू झाला आहे. या गूढ मृत्यू प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. ठाकरे सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधकांचा स्पष्ट रोख आहे. संजय राठोड व पूजा चव्हाण या तरुणीचे संबंध असल्याचे काही फोटो व व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. सोशल मिडीयावर देखील संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सूर उमटतोय.
यामुळेच संजय राठोड यांचा पूजा चव्हाणच्या मृत्यूशी संबंध असल्याचा आरोप भाजपने केला आहे . याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिलेला आहे. ते म्हणाले कि, ‘जर का उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा सोमवारपर्यंत राजीनामा घेऊन त्यांच्यावर चौकशी नाही सुरु झाली तर सभागृहातील कामकाज चालू देणार नाही’ असा सज्जड दम चंद्रकांत पाटील यांनी भरलेला आहे.
गेल्या काही महिन्यात मंत्र्यांशी संबंधित अनेक गुन्हे दाखल होत आहेत मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यात काहीच भूमिका घेत नाहीत. आता पूजा चव्हाण प्रकरणात जर मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेऊन संजय राठोड यांची हकालपट्टी केली नाही तर तोंड न उघडणाऱ्या या सरकारला, अधिवेशनातही तोंड उघडू देणार नाही, अशी आक्रमक भमिका पाटील यांनी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ख्रिस गेलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी टी-20 वर्ल्ड कपमध्ये गेलचे पुनरागम
- दारू विकणाऱ्यानेच दिली दारू विक्रीची तक्रार, मग काय? खाल्ला मार!
- सावधान! ‘या’ रुग्णांची माहिती लपवल्यास होणार २ वर्षांचा कारावास
- याजसाठी केला होता अट्टाहास, पण शेवट वाईट झाला! चित्रा वाघ यांचा भाजप प्रवेश निष्फळ?
- खाम स्वच्छता मोहीम,नव्या ‘स्मार्ट’ सीईओंची अनुपस्थिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
