Share

Atul Londhe | “‘ती’ चूक भाजपने मुद्दामहून केली, कारण त्यांना धार्मिक शांतता नांदू द्यायची नाहीय”

Published On: 

🕒 1 min read

नागपूर :  1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये याकूब मेमनच्या कबरीला सजवण्यात आलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. या मुद्यावरून राज्यात चर्चांना उधाण आलं आहे. अशातच महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यावरून भाजप पक्षाला लक्ष्य केलं आहे.

अतुल लोंढे नेमकं काय म्हणाले?

याकूब मेमनचे शव त्याच्या कुटुंबीयांना द्यायलाच नको होते, ते दिले गेले. ही तेव्हाच्या भाजप सरकारची चूक होती, नव्हे ती चूक त्यांनी मुद्दामहून केली होती, असा आरोप अतुल लोंढे यांनी भाजप पक्षावर केला आहे. अतुल लोंढे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

भारतीय जनता पक्षाने ही चूक मुद्दामहून केली आहे. कारण त्यांना या देशात धार्मिक शांतता नांदू द्यायचीच नसल्याचंही लोंढे यांनी म्हटलं आहे. युपीए सरकारच्या काळात दोन कुख्यात आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा दिली गेली होती. त्यातील एक होता अफजल गुरू आणि दुसरा अजमल कसाब. त्यांचे शव त्यांच्या कुटुंबीयांना दिले गेले नव्हते. ते शव एका विशिष्ट ठिकाणी गाडल्या गेले होते, असं लोंढे यांनी सांगितलं आहे.

पुढे ते असंही म्हणाले की, याकूब मेमनला जेव्हा फाशीची शिक्षा दिली गेली, तेव्हा त्याचे शव त्याच्या कुटुंबीयांना दिले गेले होते. त्याच्या अंत्ययात्रेमध्ये मोठ्या संख्येने लोक आले होते. तेव्हा भाजपचे सरकार होते. भाजपने तेव्हा या सर्व परवानग्या दिल्या होत्या. त्यामध्ये त्यांचा राजकीय फायदा होता. त्यामुळे आता भाजपने या गोष्टीचे उत्तर दिले पाहिजे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!