🕒 1 min read
मुंबई : ठाकरे सरकारला खाली आणून देखील अनेक नेत्यांवर आरोप होताना दिसत आहे. अशातच मुंबईतील महाकाली गुंफेमध्ये शिवसेना पक्षाचे नेते रवींद्र वायकर 500 कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत आज सोमय्यांनी परिषद घेतली होती.
रवींद्र वायकर यांच्या किरीट सोमय्या यांच्याकडून आरोपः
महाकाली गुंफेमध्ये रवींद्र वायकर यांनी 500 कोटींचा घोटाळा केला असून 500 कोटी बिल्डरला दिले आहेत, असा आरोप सोमय्यांनी केला आहे. तसेच या बिल्डरांमध्ये अविनाश भोसले, शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांचा समावेश असल्याचं सौमय्यांनी सांगितलं आहे. उद्धव ठाकरेंचा उजवा हात संजय राऊत जेलमध्ये डावा हात अनिल परब रिसॉर्ट तुटणार आहे, तर तिसरा हात वायकरांनी घोटाळा केला आहे, अशी टीका सोमय्यांनी केली.
हे याकूबचे स्मारक बांधायला निघालेतः
उद्धव ठाकरे यांच्या घोटाळ्याचं स्मारक आहे, त्यासाठी काल मी दापोलीला गेलो होतो, असं सोमय्यांनी सांगितलं. एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्या घोटाळ्याचं स्मारक उद्ध्वस्त करायचं तर दुसरीकडे हे लोक हिरव्या रंगात रंगले आहेत, 1993 च्या ब्लास्टमधील अतिररक्याचे स्मारक करण्यात हे व्यस्त आहेत, एकाबाजूला स्वतःच्या भ्रष्टाचाराचं स्मारक करायचं आहे, तर दुसऱ्या बाजूला याकूबचे स्मारक देखील करत आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले. ईश्वर साकडे आणि नरेश सराफ हे 1993 चे पीडित असून नरेश सराफ यांचा उजवा पाय गेला. आज 30 वर्ष झालेत. हे याकूबचे स्मारक बांधायला निघालेत, तर ईश्वर साकडे यांना गोळी लागली, उद्धव ठाकरे हे बघणार का? पालिका हे बघणार का? असा सवालही सोमय्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Aditya Thackeray | याकूब मेमन कबर सजावटीवरून आदित्य ठाकरेंचे भाजपला प्रत्युत्तर, म्हणाले…
- Supriya Sule | “राज्याला सध्या दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे, एक…”, सुप्रिया सुळेंची एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका
- Udayanraje Bhosale | “मिशीला पीळ आणि ताव मारुन काहीही होत नसते”
- Ashish Shelar |”पेंग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा” ;आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर टीका
- Nirmala Sitaraman | “महागाई कमी करणं आता आमचं प्राधान्य नाही…” – निर्माला सीतारामन


