🕒 1 min read
मुंबई : 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये याकूब मेमनच्या कबरीला सजवण्यात आलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. याच मुद्यावरून भाजप पक्षाचे नेत्यांनी शिवसेना पक्षाला टार्गेट केलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच भाजपच्या सर्व टीकांना शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आदित्य ठाकरे यांचे वक्तव्य-
पहिली गोष्ट म्हणजे त्या माणसाचं दफन का झालं? आपण त्याला अतिरेकी म्हणून फाशी दिली. ओसामा बिन लादेनचं समुद्रात दफन झालं. मग याचं एवढं मोठं दफन यांनी का केलं?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी भाजपला केला आहे.आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावळी ते बोलत होते. पुढे ते असंही म्हणाले की, दफन करताना एनओसी घेणं गरजेचं आहे. ती एनओसी कुठेही नाही. महत्त्वाचं म्हणजे ही ट्रस्ट खासगी आहे. त्यामुळे महापालिकेचा त्याच्याशी काडीमात्र संबंध नाहीय.
खरं बोलणं कधीकधी कठीण असतं-
एक तर सणाच्या दिवसांमध्ये राजकारण ही एक घाणेरडी गोष्ट झालीये. याप्रकरणातली तथ्य लोकांसमोर यायला हवीत. आरोप करणं सोपं असतं. पण खरं बोलणं कधीकधी कठीण असतं. आज खरं बोलणं गरजेचं असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
तसेच, आपल्या देशात 18 महिन्यात मृतदेहाचं रोटेशन व्हायला हवं असा कायदा आहे . कारण त्या मृतदेहाचं विघटन व्हायला लागतं. मग हे का झालं नाही?, असा सवालही याठिकाणी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे
महत्वाच्या बातम्या :
- Nirmala Sitaraman | “महागाई कमी करणं आता आमचं प्राधान्य नाही…” – निर्माला सीतारामन
- Ashish Shelar | “पेंग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा”
- Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी – चंद्रशेखर बावनकुळे
- Chandrasekhar Bawankule | “मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी किती तडजोड केली, याचे स्पष्टिकरण त्यांनी द्यावे”
- Atul Bhatkhalkar | “गृहमंत्र्यांबाबत बोलण्यापुर्वी उद्धव ठाकरेंनी त्यांची लायकी बघावी…”, अतुल भातखळकरांचा ठाकरेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

