Share

Supriya Sule | “राज्याला सध्या दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे, एक…”, सुप्रिया सुळेंची एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका

Published On: 

मुंबई : सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकार आणि निर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्यावर भाष्य केलं आहे. सध्या राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक मुख्यमंत्री जे मंत्रालयात बसून काम करू शकेल आणि दुसरे मुख्यमंत्री जे वेगवेगळ्या पद्धतीने फोटोसेशन आणि गणपती दर्शन करत बसतील, असा टोला सुळेंनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

सुप्रिया सुळे यांचा एकनाथ शिंदे यांना टोलाः

मी स्वतः अनेक मंत्र्यांना माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या कामासाठी वेळ मागितला, मात्र, ते वेळ देत नाहीत. याचा अर्थ प्रशासन गेल्या अडीच महिन्यांपासून ठप्पा आहे, हे सरकार ज्या पद्धतीने सांगितलं जातं ओरबडून आणि चुकीच्या पद्धतीने आलेला आहे आणि त्याचा परिणाम प्रशासनावर होताना दिसत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

शिक्षकांचा मुद्दा खरतर अत्यंत गंभीर आहे. त्याबद्दल शालेय शिक्षण मंत्र्यांनी बोलावं असा सल्लाही सुळे यांनी दिला आहे. यावेळी सुळेंनी मंत्रईपदांवर देखील टीका केली. अजून पालकमंत्री नाही, अजितदादा ज्यावेळेस पालकमंत्री होते त्यावेळेस पुण्यामध्ये ते सकाळपासून काम करायचे, मात्र आता पालकमंत्री नाहीये त्यामुळे कशा पद्धतीने कामकाज ठप्प आहे, आरोग्य मंत्री म्हणून राजेश टोपेंनी जे काम केलं ते आपण बघितलं. अख्या देशाने ते काम बघितलेलं आहे. पण आताचे आरोग्य मंत्री फक्त वादातच असल्याचा आपल्याला पाहायला मिळतात, असं देखील सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, माझ्यासमोर सध्या बेरोजगारी, महागाई हे जनतेच्या संबंधित प्रश्न महत्त्वाचे मुद्दे आहेत. केंद्र सरकारने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. इतर प्रकल्प राबवण्यापेक्षा महागाई आणि बेरोजगारी कशी कमी करता येइल यावर चर्चा होणं अपेक्षित आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्याः

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!