Share

Udayanraje Bhosale | “मिशीला पीळ आणि ताव मारुन काहीही होत नसते”

Published On: 

सातारा : सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक विषयाच्या चर्च्या रंगू लागल्या आहेत. यामध्ये निवडणूकांचं वारंही राज्यामध्ये घुमू लागलं आहे. यामुळे पक्ष नेत्यांंमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी सुरू झाली असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याचप्रमाणे सातारा महानगरपालिकेच्या निवडणुकाही तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे भाजप पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले आणि भाजप पक्षाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये चढाओढ सुरू झाली आहे.अशातच उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावक निशाणा साधला आहे.

उदयनराजे भोसले नेमकं काय म्हणाले?

मिशीला पीळ आणि ताव मारुन काहीही होत नसतं, असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना खोचक टोला लगावला आहे. उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

आपली कारकीर्द सांगताना उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्य जनसंपर्क कार्यालयावरही टीका केला आहे. शिवेंद्रराजे यांच्या आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. या निवडणुकीचा निकाल आत्ताच लागला असल्याचं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

तसेच, शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये हिंमत असेल तर आजच्या आज पत्रकार परिषद घेऊन दाखवावी, असं आव्हानही उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे यांना केलं आहे. त्याचबरोबर सातारा विकास आघाडी 50 जागा जिंकणार असल्याचा विश्वासही उदयनराजे यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!