Share

एवढं धडधडीत खोटं बोलण्याची ‘ऊर्जा’ कुठून मिळते?; भातखळकरांचा नितीन राऊत यांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कोल इंडिया लिमिटेड (Coal India Limited) कंपनी देशात सर्व वीज कंपन्यांना कोळसा पुरवते. त्यांच्या अव्यवस्थापनामुळे वीज भारनियमन निर्माण झाले आहे, असे राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी म्हटले आहे. कोळशाच्या उपलब्ध परिस्थितीनुसार दररोज कोळसा दिला जातो.  या स्थितीत फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देश असल्याचे नितीन राऊत यांनी म्हटले आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्वीट करत टीका केली आहे.

वीज भारनियमन कोल इंडिया लिमिटेड कंपनीमुळं इति ऊर्जा मंत्री. सबंध देशात फक्त महाराष्ट्रात कोल इंडिया कंपनीमुळे कोळशाची टंचाई आहे. शेजारी राज्ये अतिरिक्त वीज बनवत आहेत. एवढं धडधडीत खोटं बोलण्याची ‘ऊर्जा’ मंत्री महोदयांना कुठून मिळते?”, असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे. 

जे वीजचोरी करतात, वीज बिल भरत नाही, अशा राज्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी वीज बिल प्रामाणिकपणे भरावे. त्यांचे उपकार सरकार विसरणार नाही. सरकारी निमसरकारी खात्यात जे नियम राज्यातील जनतेला आहे, तेच नियम तेच निकष सर्व खात्यांना लागू आहेत. तसेच दानवे साहेबांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा आम्हाला सहकार्य करायला हवे. त्यांच्याकडे रेल्वे खाते आहे. असेही नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!