🕒 1 min read
कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आंदोलन करत हल्ला केला होता. या प्रकरणी १०९ एसटी कर्मचाऱ्यांसह वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली होती. सदावर्ते यांना आज सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सातारा न्यायालयाने त्यांना १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता सदावर्ते यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.
मुंबई आणि सातारा यानंतर आता कोल्हापूरच्या शाहूपुरी ठाण्यातही सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा.द.वि.स कलम 153 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन समाजामाध्ये, तेढ निर्माण होईल, सामाजिक एकोप्याला बाधा निर्माण होईल, अशी कृती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मराठी क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी काही दिवसांपुर्वीच ही तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
दरम्यान आज दुपारी सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. खासदार संभाजीराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. २०२० मधील हे प्रकरण आहे. सातारा पोलिसांनी सदावर्ते यांना या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतले होते. आज कोर्टात त्यांना हजार करण्यात आले. यावेळी कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- IPL 2022 : नाणेफेक जिंकत हैदराबादचा गोलंदाजीचा निर्णय; कोलकात्यात फिंचचे आगमन!
- अखंड भारताच्या मुद्द्यावर पवारांचा भागवतांना खोचक टोला, म्हणाले…
- “कोर्ट आमच्यासाठी आहे, कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात” ; भाजप आमदार कुटे यांचं अजब वक्तव्य
- IPL 2022 वर पुन्हा कोरोनाचे सावट! दिल्ली संघात पॉसिटीव्ह केस मिळाल्याने खळबळ
- फडणवीसांच्या १४ ट्विट नंतर, हिंदू महासभेचे भाजपला १७ सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
