🕒 1 min read
मुंबई:आयपीएल सुरु होऊन तीन आठवडे सरत आले आहेत. स्पर्धेत यंदा गतवर्षीचे विजेते चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खराब झाली आहे. आरसीबी विरुद्ध पहिला सामना जिंकल्यानंतर आता चेन्नईला मोठा धक्का बसला आहे. मेगा ऑक्शनमध्ये १४ कोटींना विकल्या गेलेला दीपक चहरला संपूर्ण हंगामाला मुकावे लागणार आहे. दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
दीपक चहरने (Deepak chahar) त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर यासंबंधी एक पोस्ट केली आहे. तो अद्याप दुखापतीतून सावरू शकलेला नाही, त्यामुळे तो या संपूर्ण आयपीएल २०२२ हंगामातून बाहेर असेल. चहरने दिलेल्या अपडेटनंतर आता चेन्नईच्या (CSK) चाहत्यांमध्ये निराशा आहे. चाहते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्याबद्दल सहानुभूती देखील व्यक्त करत आहेत.
चेन्नई सुपर किंग्जसाठी यंदाचे सीजन तसेही खराब सुरु आहे. आता यात भर म्हणून दीपक चहरचे स्पर्धेतून बाहेर पडणे चेन्नईसाठी दुष्काळात तेरावा महिना ठरला आहे. दीपक चहरच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून कोण येईल याची माहिती अजून आलेली नाही. मात्र आता दीपकचे स्पर्धेतून बाहेर पडणे चेन्नईला मोठे नुकसान देणारे ठरले आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- सदावर्तेंना तिहेरी झटका! मुंबई, साताऱ्यानंतर आता कोल्हापुरातही गुन्हा दाखल
- IPL 2022 : नाणेफेक जिंकत हैदराबादचा गोलंदाजीचा निर्णय; कोलकात्यात फिंचचे आगमन!
- अखंड भारताच्या मुद्द्यावर शरद पवार यांचा भागवतांना खोचक टोला, म्हणाले…
- “कोर्ट आमच्यासाठी आहे, कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात” ; भाजप आमदार कुटे यांचं अजब वक्तव्य
- IPL 2022 वर पुन्हा कोरोनाचे सावट! दिल्ली संघात कोरोना पॉसिटीव्ह केस मिळाल्याने खळबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
