मुंबई : नवी मुंबईतील एका कार्यक्रमात कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्याचे मंत्री अनिल देशमुख व नवाब मलिक यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली नाही. यावर भाजपने शुभशकून म्हंटले होते.
यावर रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आरोप सिद्ध न होता त्या दोन लोकांना जेल मध्ये ठेवले जात आहे. सीबीआय आणि ईडीचा वापर करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. असा टोला त्यांनी भाजपला यावेळी लगावला. भाजप काही बोलल तरी महाविकास आघाडीचे सर्व नेते काळजी घेऊन येणारी निवडणूक लढतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

