Share

विधान परिषेदेत भाजपला आमदार फुटण्याचा धोका; राष्ट्रवादीचीही अडचण तर काँग्रेसची धावाधाव!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यसभा निवडणुकीला प्राप्त झालेले नाट्यमय वळण, राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात जाऊन उभा राहिलेला वाद. आणि मध्यरात्री नंतर आलेला निकाल पूर्ण देशाने पहिला. यामध्ये शेवटी भाजपने आपला तिसरा उमेदवार निवडून आणला. यानंतर राज्यभर भाजपाने हा विजय मोठ्या जल्लोषात साजरा केला. आता विधान परिषद वेळी देखील याची पुनरावृत्ती होईल, असं भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांनी म्हटलं आहे.

आता होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे. मात्र याचा सर्वात जास्त धोका भाजपाला वाटू लागला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी आवश्यक तेवढे संख्याबळ नसल्याने दोन्ही पक्षांकडून अनेक आमदारांशी संपर्क साधला आहे. पहिल्याच फेरीत निवडून येण्यासाठी उमेदवारांना छोट्या पक्षांचे आमदार आणि अपक्ष आमदारांची गरज आहे.

राज्यसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीमुळे भाजपला आश्चर्यकारकरित्या तिसरी जागा जिंकता आली. परंतु आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत गुप्त मतदान होणार आहे. त्यामुळे भाजपचे अनेक आमदार फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचे अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा आहे.

कॉंग्रेसकडून दोन आमदार या निवडणुकीत उभे आहेत. भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे, त्यांच्याकडे केवळ ४४ आमदारांचे संख्याबळ आहे. या दोन उमेदवारांपैकी एका उमेदवाराला पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी कॉंग्रेसला अतिरिक्त दहा अधिक मतांची गरज आहे. पहिल्या फेरीतच आपल्या उमेदवारांना मतांचा कोटा पूर्ण व्हावा, यासाठी कॉंग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

भाजपला पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी एकूण १३५ मतांची गरज आहे. भाजपला मतांची जुळवाजुळव करण्यासाठी जास्त कसरत करण्याची गरज आहे. छोट्या पक्षांचे आमदार आणि अपक्ष आमदारांना संपर्क साधायला भाजपने सुरुवात केली आहे. भाजपकडं १०६ आमदार असून त्यांना पाचवा उमेदवार विजयी करण्यासाठी सर्व मतं बाहेरून आणवी लागणार आहेत. राष्ट्रवादीकडून दोन उमेदवार उभे असले तरी, न्यायालयाने अनिल देखमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारल्याने राष्ट्रवादीची दोन मते कमी झाली आहेत. एकनाथ खडसे यांना पहिल्या फेरीत निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीला अतिरिक्त मतदानाची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!