Share

भारताचा विराट कोहली आणि पाकिस्तानचा बाबर आझम एकाच संघासाठी खेळणार?

Published On: 

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० विश्वचषक सामना ऑक्टोबरमध्ये प्रस्तावित आहे. या सामन्याची तिकिटे काही मिनिटांतच विकली गेली. यावरून अंदाज लावता येईल की चाहते दोन्ही देशांमधील सामन्याची किती आतुरतेने वाट पाहत आहेत. पण दोन्ही देशांमधील वादामुळे २०१२-१३ पासून द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आलेली नाही. आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकत्र खेळताना दिसले तर चाहत्यांच्या आनंदाला पारावर उरणार नाही. आता विराट कोहली आणि बाबर आझम एकाच संघाचा भाग असल्याबद्दल मोठे नियोजन केले जात आहे.

फोर्ब्सच्या बातमीनुसार, पुढील महिन्यात आयसीसीची बैठक होणार आहे. यात आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह, आफ्रिकन क्रिकेट संघटनेचे नवे अध्यक्ष सुमोद दामोदर, एसीसी विकास समितीचे अध्यक्ष महिंदा वल्लीपुरम, जे आयसीसी बोर्डाचे सहयोगी सदस्य संचालक देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) कमर्शियल आणि इव्हेंट्सचे प्रमुख प्रभाकरन थनराज म्हणाले की, भारत असो की पाकिस्तान असो, आफ्रो आशिया चषक स्पर्धेसाठी कोणतेही मंडळ प्रस्ताव आणण्याची शक्यता कमी असली तरी आशा जास्त आहे.

सर्व काही सुरळीत राहिल्यास या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान बोर्डामधील वाद मिटण्यास मदत होईल. सुमोद दामोदर म्हणाले, दोघांमध्ये सामंजस्याची संधी मिळाल्याने आम्ही आनंदी आहोत आणि दोन्ही देशांच्या खेळाडूंना एकत्र खेळताना बघायचे आहे. यापूर्वी २०००च्या मध्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी आणि वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड भारतासाठी एशिया इलेव्हनकडून खेळताना दिसले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!