🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघाने १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच एकदिवसीय विश्वविजेतेपद जिंकून जगाला चकित केले होते. त्यावेळी २४ वर्षीय युवा खेळाडू कपिल देव यांनी इंग्लंडमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. ३९ वर्षांपूर्वी वेस्ट इंडिज आणि इंग्लंडसारख्या दिग्गज संघांसमोर भारतीय संघ विश्वचषकाचे जेतेपद पटकावू शकेल, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. पण हे अशक्य कपिल देव यांनी शक्य करून दाखवले. १८ जून १९८३ रोजी कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध करा किंवा मरोच्या सामन्यात १७५ धावा केल्या. त्यावेळी वनडे फॉरमॅटमधील ही सर्वात मोठी खेळी होती.
झिम्बाब्वेने भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करून खळबळ उडवून दिली. या सामन्यात कपिल देव यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरला नाही आणि भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. भारताचे पाच महत्त्वाचे खेळाडू अवघ्या १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. ऑस्ट्रेलियापाठोपाठ झिम्बाब्वेचा संघ भारताला हरवेल, असे वाटत होते.
175* off 138 balls ????
On this day in 1983, Kapil Dev produced one of the greatest individual performances of all-time to help India beat Zimbabwe in @cricketworldcup 1983 ???? pic.twitter.com/g4H2CcGQhU
— ICC (@ICC) June 18, 2022
टीम इंडियाच्या पाच विकेट पडल्यानंतर कपिल देव यांनी मैदानावर कमान सांभाळली. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना कपिल देव यांनी प्रथम रॉजर बिन्नी, रवी शास्त्री आणि मदन लाल यांच्यासोबत छोट्या भागीदारी केल्या. भारताची आठवी विकेट १४० धावांवर पडली. यानंतर सय्यद किरमाणी (नाबाद २४) सोबत नाबाद १२६ धावांची भागीदारी केली. भारतीय संघाने ६० षटकांत आठ विकेट्स गमावून २६६ धावा केल्या. कपिल देव यांनी नाबाद १७५ धावांची ऐतिहासिक खेळी खेळली. त्यांनी आपल्या खेळीत १६ चौकार आणि ६ षटकार मारले. भारताने हा सामना ३१ धावांनी जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
