🕒 1 min read
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) चौथ्या टी-२० सामन्यामध्ये टीम इंडियाच्या विजयात वेगवान गोलंदाज आवेश खानने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने १८ धावांत ४ बळी घेतले. त्याची टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी त्याला ५ सामन्यात फक्त २ विकेट घेता आल्या होत्या. २३ धावांत २ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही. अशा परिस्थितीत ही कामगिरी त्याच्यासाठी खास होती. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम खेळताना ६ विकेट्सवर १६९ धावा केल्या होत्या. सामनावीर दिनेश कार्तिकने २७ चेंडूत ५५ धावा केल्या. त्याचे हे टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक आहे. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ १६.५ षटकांत ८७ धावाच करू शकला. अशा प्रकारे भारताने ८२ धावांनी विजय मिळवला.
सामन्यानंतर आवेश म्हणाला, ”मी माझ्या कामगिरीवर खूश आहे. विशेष म्हणजे आज पप्पांचा वाढदिवस आहे. अशा परिस्थितीत मला माझ्या विकेट त्यांना समर्पित करायच्या आहेत. खेळपट्टीवर उसळी होती. त्यामुळे आम्हाला विकेट-टू-विकेट गोलंदाजी करायची होती. त्यात आम्ही यशस्वी झालो. आतापर्यंत आम्ही क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आम्ही ते कायम राखू इच्छितो.”
India win by 82 runs and level the series 2-2.
Avesh Khan 4/18 | Chahal 2/21 #INDvSA https://t.co/jlRY5fwlXo pic.twitter.com/aKcvBkkiIo
— Cricbuzz (@cricbuzz) June 17, 2022
टीम इंडियाने पहिल्या ४ सामन्यांमध्ये त्याच प्लेइंग-११ला संधी दिली आहे. प्रशिक्षक राहुल द्रविडने आपल्या खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. मालिकेतील अंतिम सामना १९ जून रोजी बंगळुरू येथे होणार आहे. याबाबत आवेश खान म्हणाला, ”पुढच्या सामन्यातही आम्ही आमचे १०० टक्के देऊ इच्छितो आणि मालिका जिंकण्याच्या इराद्याने पुढे जाऊ.”
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
