🕒 1 min read
मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे आणि मुंबई शहर पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांच्यात बदल्यावरुन न्यायालयात वाद सुरु आहेत. ३ फेब्रुवारी रोजी याबाबत न्यायालयात सुनावणी होणार आहे. DGP संजय पांडे यांनी १८७ पोलीस अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्यामुळे नागराळे यांना दिलासा न मिळाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
पोलिस महासंचालक पोलिसांच्या बदल्या करतायत, पोलीस आयुक्त त्याविरुद्ध कोर्टात धाव घेतात. राज्य पोलिसांत अशा अंतर्गत मारामाऱ्या सुरू आहेत कारण, गृहमंत्री निष्क्रिय आणि मुख्यमंत्री घरी बसलेले, अशी दुर्दैवी परिस्थिती आहे. pic.twitter.com/NmEmzv9dqn
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 1, 2022
अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले, ‘पोलीस महासंचालक पोलिसांच्या बदल्या करतात, पोलीस आयुक्त त्याविरुद्ध कोर्टात धाव घेतात. राज्य पोलिसांत अशा अंतर्गत मारामाऱ्या सुरू आहेत कारण, गृहमंत्री निष्क्रिय आणि मुख्यमंत्री घरी बसलेले, अशी दुर्दैवी परिस्थिती आहे.’ अशी टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.
या प्रकरणावर मॅट (MAT) ने सोमवारी सुनावणी केली. DGP पांडे यांनी बदली केलेल्या १८७ अधिकार्यांपैकी नागराळे यांना दिलासा न मिळाल्याने त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. २० जानेवारीच्या आधीच्या सुनावणीत MAT ने स्पष्टीकरण दिले होते की, ‘पांडे आणि नागराळे यांच्यात मतभेद असल्याचे दिसून येते. शहर पोलीस आयुक्त थेट राज्य सरकारला अहवाल देतात, तर उर्वरित पोलीस अधिकारी महासंचालक कार्यालयाला अहवाल देतात.’
‘२४ जानेवारी रोजी न्यायाधिकरणाने पांडे यांना पर्याय न देता विनंतीच्या आधारावर या बदल्या करण्यास कशामुळे प्रवृत्त केले हे स्पष्ट करा. प्रशासकीय न्यायाधिकरणाने नागराळे यांच्याशी सल्लामसलत का केली नाही? याबद्दल त्यांचे उत्तरही मागितले. तसेच जेव्हा पोलीस आस्थापना मंडळाचे कार्यवृत्त प्रसारित केले गेले तेव्हा त्यावर अतिरिक्त मुख्य सचिव, अपील आणि सुरक्षा यांची स्वाक्षरी का नव्हती.’ असे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने दोन वर्ष फुकट गेली, याला सर्वस्वी जबाबदार मोदी सरकार”, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
- “मुख्यमंत्री दारात वाईन… मद्यधुंद सरकारची नशा कधी उतरणार?”, चित्रा वाघ यांचा सवाल
- २१वे ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या राफेलला मास्टर ब्लास्टर सचिनकडून अनोख्या शुभेच्छा
- लग्नसमारंभासाठीच्या निर्बंधात बदल; जाणून घ्या किती जणांना असेल परवानगी
- “तुम अपनी जलन बरकरार रखो, हम अपना जलवा…”, संजय राऊतांचा विरोधकांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
