मुंबई : सध्या देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीवरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांत प्रचंड आरोप प्रत्योरोप सुरु आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) संजय राऊत यांनी काहीही झाले तरी महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, असा दावा केला आहे. यासह इतर मुद्द्यावर भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. त्याला संजय राऊतही जशास तसे उत्तर देताना दिसून येत आहेत. संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची वाईन कंपनीत भागीदारी असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. या टिकेला राऊतांनी ट्विट करत शायरीतून प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत ट्विट करत म्हणाले, जय हिंद! “तुम अपनी जलन बरकरार रखो, हम अपना जलवा बरकरार रखूंगा”, असा इशारा संजय राऊतांनी विरोधकांना दिला आहे.
जय हिंद! pic.twitter.com/BuFwYCTHUG
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 1, 2022
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची वाइन कंपनीत भागीदारी असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रविवारी केला. तर भाजप नेत्यांची मुले चणे-फुटाणे विकतात का, असे प्रत्युत्तर खासदार राऊत यांनी दिले. मी आत्तापर्यंत कोणाच्याही कुटुंबावर बोललो नाही. पण सोमय्या यांनी मोठी चूक केली असून त्यांना याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
खासदार राऊत यांचे मित्र अशोक गर्ग यांनी २००६ मध्ये मँगपी ग्लोबल लि. कंपनी स्थापन केली. खासदार राऊत यांच्या कुटुंबीयांनी १६ एप्रिल २०२१ रोजी मँगपी समूहाशी भागीदारी केली. राऊत यांच्या दोन्ही मुली विधिता व पूर्वशी या कंपनीत संचालक आहेत. या दोन्ही कंपन्या हॉटेल्स, पब, बार आदींना वाईन पुरविण्याचे काम करतात. सुपर मार्केट व दुकानांमधून वाईन पुरविण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्याने राज्य सरकारबरोबरच राऊत कुटुंबीयांचा महसूलही वाढेल, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या
- “..खाऊ भाईजानला कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे”, रुपाली पाटील आक्रमक
- अफवा पसरवणाऱ्या ‘हिंदुस्थानी भाऊ’ला अटक; आज कोर्टात हजर करण्याची शक्यता
- विद्यार्थ्यांची माथी भडकवणारा ‘हिंदुस्थानी भाऊ’ नेमका आहे तरी कोण? जाणून घ्या सर्वकाही!
- “आता सहन होत नाही…”; ममता बँनर्जींनी राज्यपालांना केले ब्लॉक
- २०२४ पर्यंत पाकयुक्त काश्मीर भारतात असेल; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

