मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने (Solapur Farmer) स्वमालकीच्या जमिनीवर दुसऱ्याने कब्जा केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न सोमवारी केला होता. या घटनेवरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. बांधावर जाऊन समस्या सोडवण्याच्या वल्गना करणारे मुख्यमंत्री घरात बसून शेतकऱ्यांच्या दारात वाईन पोहोचवण्याचं काम करताहेत. मद्यधुंद सरकारची नशा कधी उतरणार? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.
शेती वादातून सुरेश पाटील या
शेतक-यानं सोलापूर
जिल्हाधिका-यासमोरच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाबांधावर जाऊन समस्या सोडवण्याच्या वल्गना करणारे CM घरात बसून
शेतक-यांच्या दारात वाईन पोहोचवण्याचं काम करताहेतशेतक-यांच्या समस्या कधी सोडवणार
मद्यधुंद सरकारची नशा कधी उतरणार?— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 1, 2022
चित्रा वाघ यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘शेती वादातून सुरेश पाटील या शेतकऱ्यानं सोलापूर जिल्हाधिकाऱ्यासमोरच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. बांधावर जाऊन समस्या सोडवण्याच्या वल्गना करणारे मुख्यमंत्री घरात बसून शेतकऱ्यांच्या दारात वाईन पोहोचवण्याचं काम करताहेत. शेतकऱ्यांच्या समस्या कधी सोडवणार मद्यधुंद सरकारची नशा कधी उतरणार?’ असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.
माढा तालुक्यातील अकोले गावचे शेतकरी सुरज पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन केले आहे. त्यांच्या शेतावर स्थानिक गावगुंडांनी बेकायदा कब्जा केल्याचा दावा त्यांनी केला आहे. याबाबत वारंवार दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने पाटील यांनी हे टोकाचे पाऊल उचललं आहे. यापूर्वी सुरज पाटील यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली होती, तरी देखील त्या तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी सोमवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातच विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
महत्वाच्या बातम्या
- ‘…योद्धा ये महान हैं’, शरद पवार कोरोनामुक्त होताच राष्ट्रवादीने दिल्या अनोख्या शुभेच्छा
- राज्यातील कोरोना रुग्णसंख्या घटल्याने निर्बंध शिथील; काय सुरु काय बंद, वाचा सविस्तर!
- “..खाऊ भाईजानला कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे”, रुपाली पाटील आक्रमक
- अफवा पसरवणाऱ्या ‘हिंदुस्थानी भाऊ’ला अटक; आज कोर्टात हजर करण्याची शक्यता
- विद्यार्थ्यांची माथी भडकवणारा ‘हिंदुस्थानी भाऊ’ नेमका आहे तरी कोण? जाणून घ्या सर्वकाही!


