Share

२१वे ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या राफेलला मास्टर ब्लास्टर सचिनकडून अनोख्या शुभेच्छा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपन फायनलमध्ये डॅनिल मेदवेदेवचा २-६, ६-७, ६-४, ६-४ , ७-५ असा पराभव करून विक्रमी २१वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे. त्याच्या करिअरच्या कमबॅक पॉईंट वर आलेले हे विजेतेपद त्याचासोबत त्याच्या चाहत्यांसाठीहि स्पेशल ठरला आहे. त्याचे जगभरातून कौतुक होत आहे. ज्यात भारतीय क्रिकेट विश्वातील मोठ्या नावांनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताचा माजी स्टार खेळाडू सचिन तेंडुलकरने राफेलचे कौतुक करणारे ट्विट केले आहे. ज्यात त्याने लिहले ” हे खूपच भारी आहे. किमान म्हणायच तर आश्चर्यकारक. २ सेटपासून खाली होण्यापासून ते तुझे २१ वे ग्रँड स्लॅम जिंकणे हे सगळेच अविश्वसनीय आहे. अभिनंदन राफेल नदाल” तर सचिन नंतर व्हीव्हीएस लक्ष्मणनेहि राफेलसाठी लिहले “” इट्स नॉट ओव्हर अंटील इट्स ओव्हर. २ सेटपासूनखालीपासून, पुनरागमन करणे आणि ग्रँड स्टाईलमध्ये जिंकणे हा एक महत्त्वाचा प्रयत्न होता.राफेल नदालचे विक्रमी २१वे ग्रँडस्लॅम आणि ऑस्ट्रेलियन ओपन उत्कृष्ट पद्धतीने जिंकल्याबद्दल अभिनंदन,” वीरेंद्र सेहवागनेही त्याच्या स्टाईलने राफेलला शुभेच्छा दिल्या आहेत.”राफेल फायर है फायर. काय अविश्वसनीय पुनरागमन आणि विजेता”

ऑस्ट्रेलियन ओपन जिंकत नदाल सर्वाधिक पुरुष एकेरी ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकणारा खेळाडू बनला आहे. रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच यांना त्याने मागे टाकले आहे. राफेल नदालने २१ ग्रँड स्लॅम जिंकले आहे तर रॉजर आणि नोव्हाक या दोघांच्याही नावावर २० ग्रँडस्लॅम आहेत. राफेलने २००५ मध्ये त्याने फ्रेंच ओपनमध्ये ग्रँडस्लॅम जिंकले होते. त्याने १३ वेळा फ्रेंच ओपन, चार वेळा यूएस ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डनमध्ये प्रत्येकी दोन वेळेस विजेतेपद मिळवले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!