Share

“अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने दोन वर्ष फुकट गेली, याला सर्वस्वी जबाबदार मोदी सरकार”, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर करत  आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने समोर आली. आता अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यासाठी या अर्थसंकल्पात काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former Chief Minister Prithviraj Chavan) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मोदींनी २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार असे आश्वासन दिले होते. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट केले जाईल. तर २०१५ साली हर घर बिजली असे म्हटले होते. मात्र या तिन्हीही गोष्टी अजूनही साध्य झाल्या नाहीत. यावरच पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, ही सर्व आश्वासने मोदींनी निवडणूक जिंकण्यासाठी दिली होती. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट म्हणजे १०० टक्के वाढ झाली की १५ टक्के झाली, २० टक्के झाली असा सवाल करत मोदींनी पोकळ, खोटी आश्वासन दिल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

तसेच २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत पोहचेल असेही मोदींनी म्हटले होते. मात्र सध्या भारताची अर्थव्यवस्था २.७ ट्रिलीयनच्या आसपास आहे. म्हणजे जवळपास दुप्पट होईल असे आश्वासन मोदींनी दिले होते. आता मोदी सरकार सांगेल की, कोरोनामुळे हे झाले नाही. मात्र मोदी सरकार किती जलद गतीने हे टार्गेट पूर्ण करते ते आम्हाला पहायचे आहे. २०२५ तर नाही मग २०२७, २८, २९ असे कधी होईल हे मोदींनी सांगावे. कारण अर्थव्यवस्थेचा विकास अत्यंत गरजेचा आहे.

गेल्या वर्षी विकास तर सोडा ७.३ टक्क्यांनी आपली अर्थव्यवस्था संकुचित पावली. त्यामुळे आज जीडीपीचे जे आकडे येतील ते निश्चितपणे कोविड पूर्वीच्याआकडेवारीनुसार साशंक असतील. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची दोन वर्ष फुकट गेली आहेत.  झिरो आहेत. आणि याला सर्वस्वी जबाबदार मोदी सरकार आहे. असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!