Share

लग्नसमारंभासाठीच्या निर्बंधात बदल; जाणून घ्या किती जणांना असेल परवानगी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णसंख्या घटल्याने ठाकरे सरकारने (big decision of Thackeray government) लागू केलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या डोसचे प्रमाण ९० टक्के आणि दुसऱ्या डोस घेणाऱ्यांचे ७० टक्के आहे तसेच १५ ते १८ वयोगटातील मुलांचं राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण झालं आहे, अशा जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यानुसार लग्नसमारंभासाठीच्या निर्बंधातही बदल करण्यात आले आहेत.

दरम्यान आता ९० टक्के लसीकरण झालेल्या ११ जिल्ह्यांत लग्नसमारंभासाठी २०० जणांना परवानगी देण्यात आली आहे.( 200 people allowed for wedding ceremonies in 11 districts) त्यानुसार मुंबई, पुणे, भंडारा,गोंदिया, चंद्रपूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे लग्नसराईमध्ये आता २०० जण सहभागी होऊ शकतात.

दरम्यान आजपासून एस्सल वर्ल्डसारखे पार्क ५० टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तसेच स्विमिंग पूल,वॉटर पार्क, सलून, स्पा, रेस्टॉरंट, थिएटर, नाट्यगृह, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांना ५० टक्के उपस्थितीत परवानगी देण्यात अली आहे. तसेच आजपासून पर्यटन स्थळांनाही पुन्हा परवानगी देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!