टीम महाराष्ट्र देशा : राज्यसभेनंतर लोकसभेतही जम्मू काश्मीरविषयीचे बहुचर्चित कलम ३७० मंजूर झाले आहे. हे विधेयक ३७० विरुद्ध ७० मतांनी मंजूर झाले. सरकारच्या या निर्णयामुळे सगळीकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. या विधेयकाच्या चर्चेवेळी राज्यसभेचे खासदार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे अनुपस्थित होते यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
शरद पवार यांनी ‘तोंडाचं ऑपरेशन असल्यामुळे मी संसदेत जाऊ शकलो नाही. पण माझे सहकारी उपस्थित होते. तसेच मी न गेल्याने फार फरक पडत नाही असंही पवार म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी कलम ३७० वर देखील भाष्य केले त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला किंवा पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती विश्वासात घ्यायला हवं होतं असं विधान केले आहे.
तसेच पुढे बोलताना त्यांनी ‘फक्त जम्मू काश्मीर नाही, तर ईशान्य भारतातही बाहेरच्या व्यक्तीला जमीन खरेदी करता येत नाही. अगदी महाराष्ट्रातही शेतकरी नसलेल्यांना कृषी जमीन खरेदी करता येत नाही ही वस्तूस्थिती आहे. तिकडे लोकं आनंद व्यक्त करत असल्याचं सांगितलं जातंय, ते आम्हाला पाहू तर द्या, तिकडे ४० हजार सैन्य पाठवलं, इंटरनेट बंद केलं मग ते कसं दिसणार’ असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
दरम्यान, या विधेयकाच्या लोकसभेतील चर्चेवेळी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हेही अनुपस्थित होते. कोल्हे हे सध्या पक्षाच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे ते सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेचे नेतृत्व अमोल कोल्हे यांच्याकडे आहे त्यामुळे ते अनुपस्थित होते.
कलम 370 हटविण्यास लोकसभेची मंजुरी, 351 विरुद्ध 72 मतांनी प्रस्तावावर शिक्कामोर्तब
पाक व्याप्त काश्मीरमध्ये भाजपचेचं २१ आमदार असणार, अमित शहांनी केली गर्जना
#Article370 : शरद पवारांना आला मुफ्ती आणि अब्दुल्लांचा पुळका
आता पाक लष्कराला भारतावर हल्ल्याचा आदेश देऊ का ? – इम्रान खान भंजाळला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

